महाविकास आघाडीत बिघाडी? मंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध जितेंद्र आव्हाड वाद पेटला

महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्री आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे.
 Eknath Shinde and Jitendra Awhad
Eknath Shinde and Jitendra Awhad sarkarnama
Published on
Updated on

ठाणे : ठाणे (Thane) महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकारण तापू लागले आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awahad) हे आमनेसामने आले असून, या निमित्ताने महाविकास आघाडीतील बिघाडी समोर आली आहे.

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची सूत्रे आव्हाडांकडे तर शिवसेनेची सूत्रे शिंदे यांच्याकडे आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या शाब्दिक युद्ध सुरु आहे. ठाणे महापालिकेत आघाडी नकोच, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. यावर आव्हाड यांनी शिंदे यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले असून, महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्री आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीबाबत आव्हाड म्हणाले होते की, मी पहिल्या दिवसापासून आघाडी व्हावी, असे सांगत आहे. आघाडी दोन्ही पक्षांच्या हिताची आहे. काही ठिकाणी त्यांना तर काही ठिकाणी आम्हाला फायदा होईल. आपण एकमेकांचे हित पाहायला हवे. उगाच अंहकारामुळे हातचे घालवून बसणे योग्य नाही. त्यामुळे आघाडीसाठी माझा हात नेहमीच पुढे आहे.

 Eknath Shinde and Jitendra Awhad
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यानंतर आता सोमय्या अडकणार?

याला शिंदे यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, शिवसेनेने नुकसान आणि फायद्याचा विचार केलेला नाही. ठाण्यात मागील 25 वर्षांपासून शिवसेना एकहाती सत्तेत आहे. त्यामुळे कुणाचे नुकसान आणि कुणाचा फायदा हे प्रत्येकाने ठरवावे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी समंजसपणाची भूमिका घ्यावी. वरिष्ठांनी चर्चा करताना अथवा भाष्य करताना महाविकास आघाडी तसेच स्थानिक पातळीवर मन दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्यावी. मी कधीही महाविकास आघाडी तसचे, राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात भाष्य केलेले नाही.

 Eknath Shinde and Jitendra Awhad
राऊत, वळसे पाटील तातडीनं मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत

ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांl शिवसेनेने एकला चलो रे भूमिका घेतली आहे. नवी मुंबई, उल्हासनगर आणि जिल्ह्यातील इतर निवडणुकांसाठी आघाडी न करण्याची भूमिका राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी घेतली आहे. यावरून ठाण्यात या दोन पक्षांत वाद सुरू झाला आहे. यावरून शिंदे आणि आव्हाड हे दोन्ही नेते समोरासमोर आले आहेत. हा वाद भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. यामुळे दोन्ही पक्षांतील स्थानिक पदाधिकारी चिंतित आहेत. ठाण्यातील वाद मिटला नाही तरी आम्हाला आघाडी हवी आहे, अशी मागणी शिवसेनेच्या नवी मुंबईतील काही नेत्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com