VijayKumar Deshmukh
VijayKumar Deshmukh sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

विजयकुमार देशमुखांना मोठा धक्का : कट्टर समर्थकांचा राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : भाजपचे (BJP) आमदार विजयकुमार देशमुख (Vijay Kumar Deshmukh) यांचे कट्टर समर्थक तथा भाजपचे शहर सरचिटणीस बिज्जू प्रधाने यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) जाण्याचा निर्णय रविवारी (ता. 20) घेतला. तत्पूर्वी, त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात आमदार देशमुख यांच्या विजयी हॅट्रिकमध्ये प्रधाने यांचा खारीचा वाटा होता. त्यामुळे विजयकुमार देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे.

प्रधाने हे 25 वर्षांपासून भाजपमध्ये होते. त्याच्याकडे संघटन सरचिटणीसनंतर शहर भाजपचे सरचिटणीसपद सोपविण्यात आले होते. विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी पक्ष संघटन वाढीसाठी प्रयत्न केले. कार्यकर्त्यांची फळी उभारली. महापालिका निवडणुकीत नगरसेवक होण्याचे त्यांचे स्वप्न होते.

सोलापूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. महापालिकेत विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या गटाचीच सत्ता आहे. भाजपची सत्ता असली तरी या दोन्ही गटामुळे पक्षाला राजकीय दृष्ट्या वर्चस्व प्राप्त करता आले नव्हते. या दोन्ही गटाच्या सत्ता स्पर्धेमुळे अनेक निष्टावंताना पदापासून वंचीत रहावे लागले आहे. त्यामुळे शहर भाजपमध्ये गेल्या काही दिवसापासून खदखद होती. त्याला प्रधाने यांच्या निर्यणयामुळे मोकळी वाट झाली आहे. भापमधील आणखी काही कार्यकर्ते पदाधिकारी महाविकास आघाडीच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, बिज्जू प्रधाने गेल्या पंचवार्षिकला त्यांनी प्रभाग क्रमांक पाचमधून भाजपच्या तिकीटावर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढविली होती. बहुजन समाज पक्षाचे नगरसेवक गणेश पुजारी व प्रधाने यांच्यात काट्याची लढत झाली होती. यामध्ये प्रधाने यांना 4 हजार 127 मते मिळाली होती. तर पुजारी यांना 4 हजार 212 मते मिळाली होती. केवळ 85 मतांच्या फरकाने प्रधाने यांना परभवाला सामोरे जावे लागले होते.

भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर शहर सरचिटणीसपदाच्या राजीनाम्यासंदर्भात बोलताना बिज्जू प्रधाने यांनी सांगितले की, मी 1995 पासून भाजपचा कार्यकर्ता आहे. पक्षाने मला अनेकवेळा युवा मोर्चा, पक्षाचे सरचिटणीस आणि गतनिवडणुकीत नगरसेवकपदाचे तिकीट देऊन संधी दिली आहे. मात्र, दरम्यानच्या काळात पक्षातून मला पाठबळ देण्याऐवजी माझे खच्चीकरण करण्यात येत असल्याचे मला दिसून आले आहे. त्यामुळे मी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT