दूध संघाच्या निवडणुकीत करेक्ट कार्यक्रमाचीच चर्चा; साठेंचा डाव यशस्वी होण्याची चिन्हे!

दूध पंढरी निवडणूक : महिला मतदार संघातील लढतीकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष
Dudh pandhari election
Dudh pandhari electionSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या (दूध पंढरी, Dudh Pandhari) संचालक मंडळाच्या निवडणुकीत महिला मतदार संघातील दोन जागांची लढत अधिक उत्सुकतेची व रंगतदार होण्याची शक्‍यता आहे. दोन जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असले तरीही चर्चा मात्र तीन नावांचीच आहे. सत्ताधारी संचालकांच्या पॅनेलमधील निर्मला काकडे व छाया ढेकणे आणि दूध संघ बचाव समितीमधील उमेदवार वैशाली साठे या तीन नावांबद्दल दूध संघाच्या राजकारणात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. दिलेला शब्द पाळणार की करेक्‍ट कार्यक्रम होणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. (Dudh Pandhari election : Solapur district's focus on women's constituency fight)

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे (Baliram Sathe) यांच्या सूनबाई वैशाली साठे यांनी दूध संघ बचाव समितीच्या माध्यमातून या निवडणुकीत आव्हान दिले आहे. दूध संघाच्या जागा वाटप फॉर्म्युल्यात महिला मतदार संघातील दोनपैकी एक जागा सोलापूर जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांना मिळाली आहे. या जागेवर आवताडे यांनी भोसे (ता. मंगळवेढा) येथील निर्मला काकडे यांना संधी दिली आहे. दुसरी जागा माजी मंत्री दिलीप सोपल यांना मिळाली असून त्यांनी या जागेवर धामणगाव (दु) (ता. बार्शी) येथील छाया ढेकणे यांना संधी दिली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष साठे हे स्वतः जिल्हा दूध संघाचे संचालक होण्यासाठी इच्छुक होते. क्रियाशील मतदार संघातून त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने त्यांची इच्छा अपूर्ण राहिली आहे.

Dudh pandhari election
शेळकेंवर राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी : जगताप, तापकीर, थोरवेंच्या पराभवासाठी आखणार डावपेच!

दूध संघामध्ये महिला मतदारसंघातून सूनबाईंना पाठविण्यासाठी त्यांनी तयार केलेला बी प्लॅन सध्या तरी यशस्वी झाला आहे. सूनबाईंचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत आपल्याला कोणाकडूनच वेळेवर निरोप मिळाला नाही, त्यामुळे हा अर्ज कायम राहिल्याची भूमिका साठे सध्या मांडत आहेत. सत्ताधारी संचालकांच्या विरोधात असलेल्या दूध संघ बचाव कृती समितीत जाऊन वडीलधाऱ्या नेतृत्वाची भूमिका साठे सध्या बजावत आहेत, हे विशेष. वैशाली साठे यांना कोण मतदान करणार? याची उत्सुकता व चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकारणात रंगली आहे. भविष्यातील बेरजेच्या राजकारणासाठी दूध संघाच्या निवडणुकीत जिल्हाध्यक्ष साठे यांच्या सूनबाईंना मदत झाल्यास अथवा न झाल्यासही त्याचे मोठे पडसाद आगामी काळात उमटण्याची शक्‍यता आहे.

आगामी निवडणुका आणि बेरजेचे राजकारण

दूध संघाच्या निवडणुकीसाठी ३१६ मतदार असून मंगळवेढा व मोहोळ या तालुक्‍यातील मतदान निर्णायक आहे. मोहोळ विधानसभा मतदार संघाला उत्तर सोलापूर तालुक्‍यातील २१ गावे जोडली आहेत. आगामी निवडणुका व बेरजेचे राजकारण पाहता साठे यांना मोहोळमधून माजी आमदार राजन पाटील यांची मदत होऊ शकते, असा अंदाज सध्या बांधला जात आहे. या निवडणुकीत करेक्‍ट कार्यक्रम कोणाचा होणार? याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या तीन प्रमुख महिला उमेदवारांशिवाय बचाव समितीच्या दुसऱ्या उमेदवार संगीता लोंढे, सारिका पाटील, सरस्वती भोसले, सुनीता शिंदे यादेखील निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.

Dudh pandhari election
राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यातच दणका : जिल्हा परिषद सदस्याचा शिवसेनेत प्रवेश!

दूध संघासाठी एकवटलेली नेते म्हणजे इंटरनॅशनल टोळी

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलमध्ये राष्ट्रवादीच्या अनेक आजी-माजी आमदारांचा समावेश झाला आहे; परंतु पक्षाचे जिल्हाध्यक्ष सांभाळणाऱ्या बळीराम साठे यांच्या सुनेला मात्र संधी मिळाली नाही. दूध संघातील सत्ताधाऱ्यांचे कारनामे आता जिल्हाध्यक्षांच्या तोंडून बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मंडळींवर पक्षाच्याच जिल्हाध्यक्षांच्या तोंडून होणारी टीका ही येत्या काळात चर्चेचा विषय होऊ शकते. दूध संघासाठी एकवटलेली नेतेमंडळी म्हणजे इंटरनॅशनल टोळी असल्याचा उल्लेख साठे यांनी केला आहे. ज्यांचे राजकीय अस्तित्व संपले, अशालासुद्धा हे लोक पुनरुज्जीवित करतात, यांच्या नादात आपणच संपू, अशा शब्दांत जिल्हाध्यक्ष साठे यांनी त्या मंडळींच्या विरोधात खदखद व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com