Sangli Gram Panchayat Elections 2023  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli News: हायटेक प्रचाराबरोबरच ब्लॅक मॅजिकचाही वापर; काळ्या बाहुल्यांची पूजा...

Sangli Gram Panchayat Elections 2023 : प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव व्हावा, यासाठी काळ्या बाहुल्यांची पूजा मांडण्यात आली होती.

Mangesh Mahale

Sangli : ग्रामपंचायत निवडणुकीत काळ्या जादूचा प्रयोग होतोय का, याची चर्चा सांगलीत सुरू झाली आहे. या प्रकारामुळे प्रतिस्पर्धी उमेदवार घाबरून गेले आहेत. हायटेक प्रचाराबरोबरच अनिष्ट प्रथांचाही वापर काही उमेदवार करीत आहेत. यामध्ये अंधश्रद्धेला बळी पडलेले आणि त्या विचारांना चिकटलेले लोक आजही अंधश्रद्धेचा आधार घेऊन त्याचा प्रचारात वापर करत असल्याचे दिसते. प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव व्हावा, यासाठी काळ्या बाहुल्यांची पूजा मांडण्यात आली होती. (Sangli Gram Panchayat Elections 2023)

सांगली जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सर्वच पॅनेलकडून प्रचारासाठी जोरदार यंत्रणा राबविली जात आहे. अशातच हरिपूर ग्रामपंचायत निवडणुकीत काळ्या जादुचा वापर केल्याची माहिती समोर येत आहे.

निवडणुकीत आपल्या पॅनेलला विजय मिळाला, यासाठी कोणीतरी काळ्या बाहुल्यांची पूजा मांडली होती. हा प्रकार मोहित पॅनेलच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी या काळ्या बाहुल्या जाळल्या. परिसरात झालेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. बाहुल्या जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सत्ता उलथवून लावण्यासाठी...

हरिपूर ग्रामपंचायतीसाठी निवडणूकीला दोन दिवस बाकी असताना हा प्रकार झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. सध्या ग्रामपंचायतीवर तांबवेकर प्रणित बोंद्रे पॅनेलची सत्ता होती. सध्या सत्ताधारी गटाची सत्ता उलथवून लावण्यासाठी मोहिते पॅनेल रिंगणात आहे. यातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

बाहुल्या जाळून अंधश्रद्धेला तिलांजली...

गुरुवारी रात्री हरिपूर येथे एका ठिकाणी काळ्या बाहुलीची जादू सर्वांना धक्का देणारी ठरली. एका घराच्या बाहेर सात बाहुल्यांची पूजा मांडली होती. त्यामुळे खळबळ उडाली. निवडणुकीच्या विजयासाठी काहींनी हा प्रकार केल्याचा आरोप मोहिते पॅनेलकडून करण्यात येत आहे, तर काळी जादू करून निवडणुका जिंकू पाहणाऱ्या विरोधकांना चपराक म्हणून मोहिते पॅनेलकडून या बाहुल्या जाळून अंधश्रद्धेला तिलांजली दिली.

तेव्हाही बाहुली चर्चेचा विषय ठरली...

सांगलीत जिल्ह्यात ९४ ग्रामपंचायतींची संख्या आहे. सदस्य पदाच्या २९ व सरपंच पदाच्या ३ अशा एकूण ३२ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक असलेल्या २६ ग्रामपंचायती आहेत. यापूर्वीही महापालिका निवडणुकीत (२०१८) मिरजेतील लक्ष्मी मार्केटमध्ये वर्दळीच्या चौकात भली मोठी काळी बाहुली टांगण्यात आली होती. विजेच्या तारेला एक राक्षसमुखी तंत्र-मंत्र असणारी ही बाहुली चर्चेचा विषय ठरली होती. अशाच प्रकार आता ग्रामपंचायत निवडणुकीत होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT