Kolhapur Municipal Corporation, Black Magic  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur: निवडणुकांच्या तोंडावर BLACK MAGIC; महापालिकेत मंतरलेला लिंबू अन् राखेचं रिंगण ; प्रशासनाला धास्ती

Kolhapur Municipal Corporation Black Magic : महापालिकेच्या मुख्य झमारतीत अनेक ठिकाणी जिने आहेत, त्यातील डाव्या बाजूच्या स्वच्छतागृहा जवळील जिन्याच्या पहिल्याच पायरीवर सायंकाळी राख लावून एक लिंबू ठेवलेला काहींना दिसून आला.

Rahul Gadkar

Kolhapur News: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली आहे. अशातच गेल्या दोन महिन्याचा कालावधी पाहता कोल्हापूर जिल्ह्यात काळ्या जादूची घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. ही काळी जादू आता महापालिकेच्या इमारतीतच घडल्याचे आढळले आहे.

मंतरलेला लिंबू त्याला राखेचं रिंगण करून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसह अधिकाऱ्यांना दिसेल अशा पद्धतीने ठेवले आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने याची धास्ती घेतली आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीतीच एका जिन्यात राख लावून मंतरलेला लिंबू ठेवल्याचा प्रकार दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धेच्या या प्रकाराची महापालिकेत जोरदार चर्चा सुरू आहे.

महापालिकेच्या मुख्य झमारतीत अनेक ठिकाणी जिने आहेत, त्यातील डाव्या बाजूच्या स्वच्छतागृहा जवळील जिन्याच्या पहिल्याच पायरीवर सायंकाळी राख लावून एक लिंबू ठेवलेला काहींना दिसून आला. त्या लिंबूभोवतीही राखेचे रिंगण मारले होते. अनेकांना मंतरलेला लिंबू पाहून धक्का बसला. चक्क महापालिकेच्या इमारतीत शिवाय रहदारीच्या ठिकाणीच मंतरलेल्या लिंबू ठेवल्याने भीतीचे वातावरण झाले.

याच जिन्यातून अधिकारी आणि नागरिकांची सतत ये-जा असते. कार्यालय सुटण्याच्या वेळेत हा प्रकार दिसून आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये त्याची जोरदार चर्चा झाली. याच जिन्यातून मुख्य लेखापरीक्षक, लेखा विभाग, आस्थापना, कामगार विभाग अशा विविध कार्यालयात जाता येते. शिवाय येथील कर्मचारी अधिकारी देखील याच मार्गावरून जातात. त्यामुळे केलेला हा प्रकार नेमका कोणासाठी होता, याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात आहे.

फायली रखडल्या...

गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या काही फायली रखडलेल्या आहेत. हेलपाटे मारून सुद्धा ही कामे मार्गस्थ लागत नाहीत. त्यामुळे काही विभागांकडून कामाबाबत होत असलेल्या टाळाटाळीमुळे हा प्रकार झाला असेल, अशीही चर्चा होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT