Solapur, 10 September : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल परीक्षण (एसआयआर) कार्यक्रमात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही सहभागी करून घेतले आहे. या प्रक्रियेत बूथ लेव्हल एजंट (बीएलए) नियुक्तीमध्ये सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकाचीही नेमणूक केलेली नाही. व्होटचोरीचा आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांच्या काँग्रेसनेही १ हजार ८८१ बीएलए नेमले आहेत. बीएलए नियुक्तीत भाजप पहिल्या, शिवसेना दुसऱ्या, शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्ष तिसऱ्या, तर काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, या बीएलए नियुक्तीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चार पैकी तीन आमदारांच्या मतदारसंघात एकाचीही बीएलए म्हणून नियुक्ती करण्यात आलेली नाही. केवळ माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्या मतदारसंघात ३४५ बीएलएची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, मोहोळचे आमदार राजू खरे, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि करमाळ्याचे नारायण पाटील यांच्या मतदारसंघात बीएलए म्हणून एकाही पक्ष कार्यकर्त्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
या प्रक्रियेत मतदारांच्या गृहभेटी, २००२ च्या मतदार यादीशी आताच्या मतदार यादीची जुळणी, जुळणी न झालेल्या मतदारांना नोटीस बजावून त्यांची नावे वगळणे, स्थलांतरित, मृत मतदारांची नावे कमी करणे, मतदान केंद्रांची पुनर्स्थापना ही महत्वाची कामे एसआयआरमध्ये केली जात आहे.
या कामासाठी शासकीय यंत्रणेतील बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) यांच्या मदतीला नोंदणीकृत पक्षाचे बीएलए नियुक्त केले जातात. बीएलए नियुक्तीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित पक्षाला कळविण्यात आले होते. यातील काही पक्षांनी उत्साह दाखविला, तर काही पक्षांनी निरुत्साह दाखविला आहे. या प्रक्रियेनंतर ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. हीच मतदार यादी आगामी सर्व निवडणुकांसाठी वापरली जाणार असल्याने या प्रक्रियेला विशेष महत्व आहे.
विधानसभानिहाय प्रत्येक राजकीय पक्षाने नेमलेले बीएलए
करमाळा (एकूण बूथ : ३४७)
काँग्रेस : २०५
भाजप : ३४७
शिवसेना : २४३
राजकीय पक्षांनी नेमलेले एकूण बीएलए : ७९५
.........................................................
माढा (एकूण बुथ : ३५५)
काँग्रेस : ३५५
भाजप : ३५५
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष : ८९
नेमलेले एकूण बीएलए : ७९९
.........................................................
बार्शी (एकूण बूथ : ३३३)
काँग्रेस : १६०
भाजप : ३३३
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष : ३०३
शिवसेना : ३३३
एकूण नेमलेले बीएलए : ११२९
.........................................................
मोहोळ (एकूण बूथ : ३३६)
काँग्रेस : १७५
भाजप : ३३६
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष : २१०
शिवसेना : १३०
एकूण नेमलेले बीएलए : ८५१
.........................................................
सोलापूर शहर उत्तर (एकूण बूथ : २८९)
काँग्रेस : २८९
भाजप : २८९
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष : २२५
शिवसेना : २८९
एकूण नेमलेले बीएलए : १०९२
.........................................................
सोलापूर शहर मध्य (एकूण बूथ : ३०४)
काँग्रेस : २६२
भाजप : २९३
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष : १५०
शिवसेना : ३०४
एकूण नेमलेले बीएलए : १००९
.........................................................
अक्कलकोट (एकूण बूथ : ३९०)
काँग्रेस : १७०
भाजप : ३९०
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष : ३७०
एकूण नेमलेले बीएलए : ९३०
.........................................................
सोलापूर दक्षिण (एकूण बूथ : ३६२)
काँग्रेस : १९०
भाजप : ३६२
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष : ३६२
शिवसेना : ३६२
एकूण नेमलेले बीएलए : १२७६
.........................................................
पंढरपूर (एकूण बूथ : ३५७)
भाजप : ३३५
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष : २८२
शिवसेना : ७०
एकूण नेमलेले बीएलए : ६८७
.........................................................
सांगोला (एकूण बूथ : ३०५)
भाजप : ३०५
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष : ३८
शिवसेना : ३०५
एकूण नेमलेले बीएलए : ६४८
.........................................................
माळशिरस (एकूण बूथ : ३४५)
काँग्रेस : ७५
भाजप : ३४५
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष : ३४५
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष : १५३
शिवसेना : ३४५
एकूण नेमलेले बीएलए : १२६३
कोणाचे किती बीएलए
जिल्ह्यातील एकूण बूथ : ३७२३
- भाजप : ३६९०
- शिवसेना : २३८१
- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष : २१८२
- काँग्रेस : १८८१
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष : ३४५
- राष्ट्रवादी काँग्रेस : ००
- एकूण : १० हजार ४७९
अजूनही आहे संधी
या प्रक्रियेत सध्या जिल्ह्यातील ५ लाख ९ हजार ६७ मतदारांना नोटीस बजाविण्यात येणार आहे. या मतदारांची सुनावणी घेऊन ही नावे मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया २९ ऑक्टोंबरपर्यंत चालणार आहे. बीएलए नियुक्तीसाठी अद्यापही पक्षांना संधी आहे. महत्वाच्या टप्प्यात आणखी कोणते पक्ष बीएलए नियुक्तीसाठी पुढाकार घेतात? या बद्दल उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.