-रविकांत बेलोशे
Mahabaleshwar News : मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यातील कोयनेच्या भूमिपुत्रांची अद्यापही परवड चालू असून दोन दिवसापूर्वी शिंदी ते आरवला जोडणारा पूल ग्रामस्थ स्वतः दुरुस्त करताना पुल कोसळून झालेल्या अपघातात तीन ग्रामस्थ गंभीर जखमी झाले असल्याने या विभागात खळबळ उडाली आहे.
कोयना धरण Koyana Dam ही महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असून या जलाशयाशेजारील सातारा जिल्ह्यातील शिंदी, वलवण, आरव, मोरणी, म्हाळुंगे, उचाट, वाघावळे, लामज, निवळी, अकल्पे, गाढवली आदी गावे आपत्तीच्या वेळी नेहमीच संपर्कही न होतात. याकडे मात्र, जिल्हा प्रशासन गांभीर्याने पाहत नाही. गेली कित्येक वर्ष जनता या पुलासाठी आक्रोश करीत आहेत. पण, याचा आवाज मुख्यमंत्र्यांच्या Eknath Shinde कानी पडत नाही.
या गावांना बाजारहाट करण्यासाठी खेड ला जावे लागते त्याला जोडणारा रघुवीर घाट ही असुरक्षित आहे. कोयना या दुर्गम विभागातील शिंदी ते मोरणी हा १४ किलोमीटरचा रस्ता गेली ३५ वर्षापासून वनविभागाच्या आडमुठे धोरणामुळे दुर्दैवाचे फेऱ्यात अडकला आहे. या समस्यांसाठी शिंदी येथील नवतरुण मित्र मंडळ नेहमी सक्रिय आहे परंतु त्यांना कसलेही यश येताना दिसत नाही.
शिंदी ते मोरणीला जोडणारा नदीवरील लोखंडी पूल गेली दहा वर्षापूर्वी पडला असून याची दुरुस्ती न झाल्याने ही गावे अनेक समस्यांना तोंड देत आहेत. प्रशासनाने या गावातील लोकांसाठी बोट दिली होती. परंतु गेली कित्येक वर्ष जनता या पुलासाठी आक्रोश करीत आहेत. पण, याचा आवाज मुख्यमंत्र्यांच्या कानी पडत नाही.
बुधवारी ग्रामस्थांनी चक्क स्वतः स्वखर्चाने हा पूल बांधण्याचा निर्णय घेतला. सर्वजण एकवटले आणि कामाला सुरुवात झाली. पण अचानक हा पूल पडला आणि ग्रामस्थ या पुलाखाली सापडले. या अपघातात रामचंद्र नाना शिंदे, आणाजी बर्गे आणि विनोद जयसिंग मोरे हे गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी त्यांना लागलीच उपचारासाठी खेड येथे नेले परंतु पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला कळवा येथील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून त्यांचेवर उपचार सुरू आहेत.
आम्ही आमच्या जमिनी कोयनेसाठी दिल्या असताना आम्हाला मात्र आता अनेक यातना सहन कराव्या लागत असून शासन मात्र आमचेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. आमच्या सुविधा आम्हालाच कराव्या लागत आहेत. मग अशा अपघातांना जबाबदार कोण ? या अपघातातील जखमींना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थ भूषण मोरे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.