Satara News : कांदाटी खोऱ्यातील तरुणांचे स्थलांतर रोखणार... एकनाथ शिंदे

Eknath Shinde दरे (ता. महाबळेश्वर) येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील विविध विकासकामांसंदर्भात आढावा बैठक झाली.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

CM Eknath Shinde News : कांदाटी खोऱ्यातील तरुण रोजगारासाठी मुंबई, ठाणे व पुणे या शहराकडे जात आहेत. त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी व गेलेल्या तरुणांना पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी येथे पर्यटन विकासाबरोबरच शेतकऱ्यांना वनौषधी, बांबू लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करुन नवीन उत्पन्नाचे साधन तयार करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

दरे (ता. महाबळेश्वर) येथील मुख्यमंत्र्यांच्या Eknath Shinde निवासस्थानी झालेल्या जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या आढावा बैठकीत श्री. शिंदे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी Satara collector, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व धरणांतील पाणी साठ्याची माहिती घेऊन मुख्यमंत्री श्री. शिदे म्हणाले, सद्य परिस्थितीत पाऊस लांबलेला असल्याने कोयना जलाशयातील कमी झालेला साठा लक्षात घेऊन तात्काळ गाळमुक्त धरण योजनेंतर्गत गाळ उचलण्यात यावा. यामुळे कोयना जलाशयाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होईल.

CM Eknath Shinde
Satara News : मुख्यमंत्री अचानक दरे गावी दाखल; प्रशासनाची तारांबळ

याचबरोबर महाबळेश्वर येथील सोळशी धरणाचा सर्वेक्षण आराखडा जलदगतीने पूर्ण करावा. जिल्ह्यातील जास्त पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी बांबू लागवड करून शेतकऱ्यांना त्याद्वारे अधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.

CM Eknath Shinde
Deepak Kesarkarयांनी सगळंच काढलं, पवारांनी केला तर उठाव, मग आमची गद्दारी कशी? | Shivsena | CM Shinde

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महाबळेश्वर पाचगणी पर्यटन विकास आराखडा, प्रदूषण नियंत्रण, घाट विकास आराखडा, स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती, तापोळा विकास आराखडा, महाबळेश्वर येथील पार्किंग, कांदाटी खोरे विकास, प्रतापगड विकास योजना, बेल एअर रुग्णालयाच्या कामांसह विविध विषयांचा आढावा घेतला.

CM Eknath Shinde
Chitra Wagh On NCP : '' उशिरा का होईना राष्ट्रवादी काँग्रेसला जाग आली असून मलिक...'' चित्रा वाघांचा खोचक टोला

जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी आदर्श शाळा व स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र ही नाविन्यपूर्ण संकल्पना जिल्ह्यात राबविण्यात येत असून शेतकऱ्यांचे आर्थिक उपन्नत वाढावे यासाठी जिल्ह्यात कृषी पर्यटनावर भर देण्यात येत असल्याचेही बैठकीत सांगितले.

CM Eknath Shinde
Narendra Modi News : आंतरराष्ट्रीय योग दिनाला अमेरिकेतून मोदींनी दिला संदेश; 'आपल्या ऋषीमुनींनी योगाची...'

जिल्हा परिषदेकडील असलेल्या विविध लोककल्याणकारी योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक श्री. शेख यांनी तापोळा येथील पोलीस चौकी सुधारण्याचे काम लवकरात लवकर सुरु करणार असल्याचे सांगितले.

CM Eknath Shinde
Karad News : सत्ताधाऱ्यांकडून जाती भेदातून राजकारणाचा घाट : बाळासाहेब पाटील

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com