Eknath Shinde,Mahesh Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Koregaon Political News: महेश शिंदेंच्या मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांकडून बंपर निधी

Umesh Bambare-Patil

-पांडुरंग बर्गे

Koregaon Shivsena News: आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे वैशिष्ठ्यपूर्ण योजनेंतर्गत कोरेगाव शहरासह साताऱ्याचे उपनगर असलेल्या पीरवाडी, इंदिरानगर व बापुजी साळुंखेनगर परिसरात विविध विकासकामांसाठी दहा कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. आमदार शिंदे यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ प्रभावाने मान्यता दिली आहे. नगरविकास विभागाने अध्यादेशदेखील काढला आहे.

कोरेगाव मतदारसंघातील पीरवाडी परिसरामध्ये नव्याने गृहनिर्माण संकुले तयार होत असून, या परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तेथे मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार महेश शिंदे Mahesh Shinde यांनी प्रस्ताव सादर केला होता, त्याच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विशेष सहकार्य केले.

पीरवाडी गावठाणासह भागातील विविध कॉलन्यांनमधील अंतर्गत रस्ते ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण करणे, बंदिस्त गटर्स बांधणे आणि दगडी पेवर्स बसविण्यासह परिसर सुशोभिकरणासाठी दोन कोटी ८५ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. हे काम तातडीने सुरु करण्याचे दिशा निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले.

पुणे- बंगळुरु महामार्गालगतच्या इंदिरानगर परिसरातील रहिवाशांच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व घरगुती कार्यक्रमांसाठी ३० लाख रुपये निधीतून सभामंडप उभारला जात आहे. बापूजी साळुंखे नगरातील रहिवाशानी केलेल्या मागणीनुसार सभामंडपासाठी ३५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

कोरेगाव शहराच्या मधोमध वाहणार्‍या तीळगंगा नदी परिसराचे सुशोभीकरणासाठी निधीची कमतरता पडू न देण्याचा शब्द आमदार महेश शिंदे यांनी दिला होता, त्यानुसार आतापर्यंत या कामासाठी २२ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या कामासाठी आता आणखी सहा कोटी ५० लाख रुपयांचा मंजूर करण्यात आला आहे.

एकूण २९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आता तीळगंगा नदी परिसर संरक्षक भिंत, सुशोभिकरण, ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण, सभामंडप बांधकाम, बागकाम, इलेक्ट्रिक पोल शिफ्टिंग करणे, दगडी पेव्हर्स बसविणे आणि यांसह अत्याधुनिक साऊंड सिस्टिम कार्यान्वित करण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आल्याचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT