Satara, 03 November : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या २१ पैकी ९ जागा बिनविरोध झाल्या होत्या, तर १२ जागांसाठी रविवारी (ता. ०१ नोव्हेंबर) झालेल्या मतदानाची मोजणी आज (ता. ०३ नोव्हेंबर) मतमोजणीत १२ पैकी पाच जागांवर भाजपने, पाच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने, तर दोन जागांवर शिवसेनेने बाजी मारली आहे. प्रत्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला बरोबरी रोखले आहे. मात्र बिनविरोध भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे तीन आणि शिवसेनेचा एकजण निवडून आला आहे, त्यामुळे बॅंकेत भाजपचे नऊ, राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ, तर शिवसेनेचे चार संचालक असणार आहेत.
सातारा जिल्हा बॅंकेच्या २१ जागांपैकी नऊ जणांची बिनविरोध निवड झाली होती. त्यात भाजपचे डॉ. अतुल भोसले, रणजितसिंह नाईक निंबाळकर, सर्जेराव सावंत, नंदकुमार मोरे, सोमनाथ धुमाळ, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील, सत्यजित वीर, ऋतुजा पाटील आणि शिवसेनेच्या मंगल पाटील यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्रित येऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक लढवली होती. त्यानुसार पहिल्या नऊ जागा बिनविरोध झाल्या होत्या, तर १२ जागांसाठी निवडणूक लागली होती.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या १२ जागांवर निवडून आलेले संचालक पुढीलप्रमाणे
सोसायटी मतदारसंघ
१) कोरेगाव
सुनील माने ४५ मते विजयी (राष्ट्रवादी)
सुनील खत्री ४४ मते पराभूत (भाजप)
मतपत्रिका फाटलेली निघाल्याने विरोधकाकडून आक्षेप, मानेंचे एक मत बाद, समसामन मते झाल्याने चिठ्ठीद्वारे निर्णय, राष्ट्रवादीचे सुनील मानेंच्या बाजूने कौल
..............
२) खंडाळा
अजय भोसले २८ मते विजयी (राष्ट्रवादी)
संजीव गाढवे २१ मते पराभूत (भाजप)
शामराव गाढवे ० मते पराभूत (अपक्ष)
........
३) महाबळेश्वर
रुपाली राजपुरे ८ मते विजयी (राष्ट्रवादी)
संजय मोरे ४ मते पराभूत (शिवसेना)
....................
४) कराड
उदयसिंह पाटील १०० मते विजयी (राष्ट्रवादी)
धनाजी पाटील ४५ मते पराभूत (भाजप)
५) जावळी
ज्ञानेश्वर रांजणे ३८ मते विजयी (भाजप)
विठ्ठल गोळे ८ मते पराभूत (राष्ट्रवादी)
.......
६) माण
जयकुमार गोरे ५३ मते विजयी (भाजप)
मनोज पोळ १४ मते पराभूत (राष्ट्रवादी)
शेखर गोरे ७ मते पराभूत (शिवसेना)
....................................
७) फलटण
संजीवराजे नाईक निंबाळकर ७१ मते विजयी (शिवसेना)
समशेरसिंह नाईक निंबाळकर ६० मते पराभूत (भाजप)
...................
८) पाटण
शंभूराज देसाई ५८ मते विजयी (शिवसेना)
सत्यजीत पाटणकर ४६ मते पराभूत (भाजप)
९) औद्योगिक विणकर मतदार संघ
चंद्रकांत जाधव २९४ मते विजयी (भाजप)
सुनील वाघ २४ मते पराभूत (अपक्ष)
.......
१०) इतर मागास प्रवर्ग (ओबीसी)
योगेश फडतरे १८८३ मते (विजयी) राष्ट्रवादी
संदीप पांचांगणे ७५ मते (पराभूत) अपक्ष
........................
११) अनुसूचित जाती जमाती
दीपक प्रल्हाद चव्हाण ६१८ मते (शिवसेना) १८४२
रवींद्र बडेकर ५ मते (अपक्ष) १६
सुरेश गायकवाड १० मते (अपक्ष) २१
सत्यवान कांबळे ६ मते (अपक्ष)
....................................
१२) भटक्या विमुक्त जमाती
अर्जुन काळे ३४९ मते (भाजप) विजयी
सुनील वाघ २८४ मते (अपक्ष)
भाजप
सातारा : सर्जेराव सावंत (बिनविरोध)
माण : जयकुमार गोरे (विजयी)
जावळी : ज्ञानदेव रांजणे (विजयी)
खटाव : नंदकुमार मोरे (बिनविरोध)
सर्वसाधारण गट : अतुल भोसले (बिनविरोध)
गृहनिर्माण : सोमनाथ धुमाळ (बिनविरोध)
भटक्या विमुक्त जाती : अर्जुन काळे (विजयी)
नागरी बॅंका, पतसंस्था : रणजितसिंह नाईक निंबाळकर (बिनविरोध)
मजूर संस्था : चंद्रकांत जाधव (विजयी)
राष्ट्रवादी
वाई : सत्यजित वीर (बिनविरोध)
कराड : उदयसिंह पाटील उंडाळकर (विजयी)
महाबळेश्वर : रूपाली राजापुरे (विजयी)
खंडाळा : अजय भोसले (विजयी)
कोरेगाव : सुनील माने (विजयी)
खरेदी विक्री संघ : मंत्री मकरंद पाटील (बिनविरोध)
महिला राखीव : ऋतुजा पाटील वाठारकर (बिनविरोध)
इतर मागास प्रवर्ग : योगेश फडतरे (विजयी)
शिवसेना
पाटण मंत्री शंभूराज देसाई (विजयी)
फलटण : संजीवराजे नाईक निंबाळकर (विजयी)
महिला राखीव : मंगल पाटील (विजयी)
अनुसूचित जाती : माजी आमदार दीपक चव्हाण (विजयी)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.