Satara Dcc Bank Result : ईश्वरी चिठ्ठीचा कौलही राष्ट्रवादीच्या बाजूने : कोरेगाव सोसायटी गटातून सुनील मानेंचा जिवलग मित्रावर विजय...

Sunil Mane win Koregaon Society constituency : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कोरेगाव सोसायटी मतदारसंघातून सुनील माने यांनी ईश्वरी चिठ्ठीद्वारे विजय मिळवला. मतपत्रिका फाटल्याने एक मत बाद झाले आणि दोन्ही उमेदवारांना ४४ मते मिळाली.
Sunil Mane
Sunil ManeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara, 03 November : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १२ जागांची मतमोजणी पूर्ण होत आली असून सर्वाधिक उत्सुकता लागून राहिलेल्या कोरेगाव तालुका सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील माने यांनी बाजी मारली आहे. मतपत्रिका फाटल्यामुळे माने यांचे एक मत बाद करण्यात आले होते, त्यामुळे माने आणि त्यांचे प्रतिस्पर्धी सुनील खत्री या दोघांना समसमान ४४ मते झाली. अखेर ईश्वरी चिट्टी टाकून निर्णय झाला असून त्यात राष्ट्रवादीचे माने यांच्या बाजूने चिठ्ठीचा कौल मिळाला, त्यामुळे कोरेगाव सोसायटी मतदारसंघातून माने यांनीच बाजी मारली.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या २१ जागांपैकी ९ जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरीत १२ जागांसाठी रविवारी (ता. ०१ नोव्हेंबर) मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज झाली. त्यात कोरेगाव सहकारी सोसायटी गटातून एकमेकांचे जिवलग मित्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे कोरेगावकर कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते.

मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील माने यांना ४५ मते मिळाली होती, तर भारतीय जनता पक्षाचे सुनील खत्री यांना ४४ मते मिळाली होती. मात्र, एक मतपत्रिका फाटलेली निघाल्यामुळे मतमोजणीत ट्टिस्ट निर्माण झाला होता. फाटलेल्या मतपत्रिकेबाबत विरोधकांच्या आक्षेपानंतर माने यांचे ते एक मत बाद करण्यात आले होते.

Sunil Mane
Satara Dcc Bank Result : उदयसिंह उंडाळकरांची 5 वर्षांच्या ब्रेकनंतर जिल्हा बॅंकेत पुन्हा एन्ट्री : मागील पराभवाची व्याजासह केली परतफेड

एक मत बाद झाल्यामुळे सुनील माने आणि सुनील खत्री या दोन्ही मित्रांना समसमान ४४ मते मिळाली. त्यामुळे या दोघांमधील लढत टाय झाली होती, त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी ईश्वरी चिठ्ठीच्या आधारे निकाल घेण्याचे ठरविले.

Sunil Mane
Satara Dcc Bank Result : भाजपला दुसरा धक्का : पाटणनंतर फलटणमध्येही पराभव, शिवसेनेच्या संजीवराजेंनी समशेरसिंह निंबाळकरांना अस्मान दाखवले

चिठ्ठी टाकल्यानंतर त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील माने यांनी बाजी मारली, त्यामुळे कोरेगावमध्ये महायुतीमधील दोन पक्षात जोरदार लढाई झाली. त्यात अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. त्यामुळे खत्री यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.