Solapur News : नवरात्रोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या दांडिया फेस्टिव्हलला अभिनेत्रीला आमंत्रित करून तिच्याशी असभ्य वर्तन करणे माजी नगरसेवक पूत्र चेतन गायकवाड याच्या चांगलेच अंगलट आले आहे. या प्रकरणी गायकवाड यास सदर बझार पोलिसांनी शुक्रवारी सोलापुरातील कंबर तलाव परिसरातून ताब्यात घेतले आहे. पुन्हा असे कृत करणार नाही, अशी नोटीस गायकवाड याला बजावण्यात आली आहे. (Called Dandiya's program and misbehaved with the actress)
सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर नवरात्रीच्या कालावधीत ता. २२ ते २६ ऑक्टोबरदरम्यान ‘दुर्गाष्टमी दांडिया फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिव्हलमध्ये २२ ऑक्टोबर रोजीच्या कार्यक्रमाला संबंधित अभिनेत्रीला बोलावण्यात आले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्या कार्यक्रमात नगरसेवक पुत्र चेतन गायकवाड (वय २८), तुषार सुबोध गायकवाड (वय २१), नागेश यशवंत येलगेरी (वय १९), प्रथमेश ऊर्फ सोनू प्रशांत खरात (वय २२, सर्व रा. सोलापूर) या चौघांनी अश्लिल शब्द उच्चारत हावभाव करून संबंधित अभिनेत्रीला अपमानित करण्याचा प्रयत्न केला होता. संबंधित अभिनेत्रीबद्दल सोशल मीडियावरही अश्लिल पोस्ट टाकण्यात आली होती. त्याबाबतची फिर्याद २६ ऑक्टोबर रोजी देण्यात आली होती.
या फिर्यादीनुसार सदर बझार पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन सीआरपीसी ४१ अ १ ची नोटिस देऊन त्यांना सोडून देण्यात आले होते. त्या घटनेपासून चेतन गायकवाड हा पोलिसांना चुकवत फिरत होता, अखेर पोलिसांनी शुक्रवारी त्याला शहरातील कंबर तलावाजवळून ताब्यात घेतले. पोलिसा ठाण्यात नेऊन पुन्हा असे कृत्य करणार नाही, याबाबतची ताकीद देणारी नोटीस त्याला देण्यात आली आहे.
दरम्यान, नवरात्रीत घडलेल्या घटनेनंतर अभिनेत्रीने महिला आयोगाकडे तक्रार नोंदविली होती. महिला आयोगाकडून सोलापूरच्या पोलिस आयुक्तांना पत्र पाठविण्यात आले होते. सोलापूरचे पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी सदर बझार पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस अधिकारी ज्योत्सना भांबिष्टे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनंतर गुंगारा देऊन फिरणाऱ्या चेतन गायकवाड याला शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला नोटीस देण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.