BJP Political News : अभिनेत्री माधुरी दीक्षित भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढविणार ? भाजपचा 'मास्टर प्लॅन' ठरला ?

Amit Shah MumbaI Tour : शाह यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह फडणवीसांसोबत बंददाराआड जवळपास ४५ मिनिटं चर्चा केली.
Madhuri Dixit
Madhuri Dixit Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. त्यांनी सपत्नीक लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. या दर्शनानंतर अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानावरील बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ निवासस्थानी गेले. या वेळी शाह यांनी शिंदे, फडणवीसांसह बंददाराआड जवळपास ४५ मिनिटे चर्चा केली. या बैठकीत शाह यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी खलबतं झाल्याची चर्चा होत आहे. जात असतानाच भाजपच्या गोटातून एक मोठी माहिती समोर येत आहे.

भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबतच्या बैठकीत शिवसेना आमदार पात्र- अपात्रता प्रकरण आणि लोकसभेच्या उमेदवारांची चाचपणी संदर्भात सविस्तर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याचवेळी मुंबईतून अभिनेत्री माधुरी दीक्षित, जळगावमधून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम, तर धुळ्यातून माजी IPS अधिकारी प्रताप दिघावकर तर पुणे लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Madhuri Dixit
Bhandara Grampanchayat : पतीचा घरकुलाचा मोह पत्नीला नडला; सदस्य पदावरून व्हावे लागले पाय उतार!

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने तरुणांच्या हृदयावर गाजवल्यानंतर अभिनेत्री माधुरी दीक्षित राजकारणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपकडून (BJP) लोकसभा निवडणुकीत त्यांना मुंबईतून तिकीट दिली जाण्याची शक्यता आहे. याआधी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळीदेखील त्यांची पुण्याच्या जागेवरून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा भाजपने केला होता. त्यावेळी माधुरी दीक्षित यांनी अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेटदेखील घेतली होती.

माजी आयपीएस अधिकारी आणि एमपीएससीचे माजी सदस्य प्रताप दिघावकर यांनीदेखील लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून पायाभूत सुविधा आणि जीडीपीत झालेल्या सुधारणांमुळे मी प्रभावित झालेलो आहे. भारताला पूर्वी सॉफ्ट स्टेट असं म्हटलं जायचं. परंतु, सर्जिकल स्ट्राइकमुळं देशाची प्रतिमा बदलली आहे. मोदी यांच्या कार्यकाळात भारताची प्रतिमा उंचावत आहे, असं दिघावकर यांनी म्हटले होते. तसेच दिघावकर यांचा लोकसंपर्कही उत्तम असून, ते धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं बोलले जात आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे पुण्याच्या जागेसाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर(Sunil Devdhar) यांच्या नावाचा विचार भाजप गांभीर्याने करत असल्याचं कळतंय.

देवधर स्वत: या जागेसाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. ते गृहमंत्री अमित शाह यांचे जवळचे असल्याचं मानले जातात. त्रिपुरामध्ये २५ वर्षांपासूनच्या डाव्यांच्या प्रभावाला खिंडार पाडून तेथे भाजपला यश मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता, तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

Madhuri Dixit
Pimpri-Chinchwad BJP: भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप 'अ‍ॅक्टिव्ह मोड'वर; कार्यकारिणीची बैठक घेत दिला 'हा' आदेश

लोकसभेच्या निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकांसाठी भाजपने जंग जंग पछाडले आहे. याच धर्तीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित, सुनील देवधर, प्रताप दिघावकर, उज्ज्वल निकम या चार नावांची चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केल्याचं सांगितलं जातं आहे. यातील दोन नावांची चर्चा अगोदरपासूनच सुरू होती. शाहांसोबतच्या चर्चेनंतर काही नावे पुढे आल्याने आता राजकीय वर्तुळात काही नावे चर्चेत आल्याने राजकीय चर्चांना तोंड फुटणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Madhuri Dixit
Amit Shah Mumbai Tour : ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी कुणी फोडली ? शिंदेंनी उघड-उघडच सांगून टाकले !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com