Sahkar Shiromani Sugar factory Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sahakar Shiromani Result : अभिजीत पाटलांना मोठा धक्का; कल्याणराव काळे गटाचे उमेदवार सरासरी १७०० मतांनी आघाडीवर

सरकारनामा ब्यूरो

Pandharpur Politic's : पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना जिंकल्यानंतर भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी कारखाना ताब्यात घेण्यासाठी निघालेल्या अभिजीत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलात कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या पॅनेलचे उमदेवार तब्बल १७०० मतांनी आघाडीवर आहेत. इतर मागासवर्ग गटातून एक उमेदवार विजयी घोषित करण्यात आला आहे. ही आघाडी मोठी असल्याने कारखान्यावर काळे पुन्हा सत्ता मिळविणार, हे आता स्पष्ट झाले आहे. (Candidates of Kalyanrao Kale Group are leading in the election of Sahakar Shiromani Sugar Factory)

भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यासाठी सत्ताधारी कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांच्या विरोधात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, डॉ. बी. पी. रोंगे अॅड. दीपक पवार यांनी एकत्रित येत आव्हान दिले होते. कारखान्यासाठी चुरशीने ९३ टक्के मतदान झाले होते. काळे यांच्या बाजूने विठ्ठल परिवारातील युवरात पाटील, गणेश पाटील, भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) निवडणुकीत उतरले होते. त्यामुळे निकालाकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

साखर कारखान्याच्या एकूण २१ जागांपैकी २० जागांसाठी ही निवडणूक झाली होती. कारखान्याच्या सहकारी संस्था मतदारसंघातून मालन वसंतराव काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित २० जागांसाठी मतदान झाले होते. त्यात काळे यांच्या गटाने सुरुवातीच्या कलामध्ये आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. ही आघाडी मोठी असल्यामुळे ती तुटण्याची शक्यता कमीच आहे, त्यामुळे कारखान्यावर काळे यांची सत्ता येणार हे आता स्पष्ट झाले आहे.

प्रचाराची पातळी खालावली

कल्याणराव काळे यांच्या विरोधात उतरलेल्या अभिजीत पाटील यांनी थकीत एफआरपी इतर मुद्द्यावरून मुद्यावरून रान पेटवले होते. प्रचाराची पातळी एकदम खालावलेली होती. अरे तुरे करत एकमेकांवर हल्ले करण्यात आले होते. त्यामुळे वसंतराव काळे कारखाना निवडणुकीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

तो डावही फसला

निवडणुकीच्या ऐन धामधुमीत अभिजीत पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा पोळ्यासाठीचा हप्ताही जाहीर केला होता. पण त्याचा परिणाम सहकार शिरोमणीच्या सभासदांवर झाला नसल्याचे दिसून येते. कल्याणराव काळे यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे शांतपणे डावपेच आखात आपला हक्काचा मतदार विरोधकांच्या हाती लागणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली हेाती. त्यामुळे पंढरपूर तालुक्यात उधळलेल्या अभिजीत पाटील यांच्या वारूला लगाम लावण्याचे काम कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल परिवाराने केल्याचे दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT