Kolhapur Loksabha Election : अमित शहांनी आम्हाला शब्द दिलाय; कोल्हापुरातून मीच लढणार, संजय मंडलिकांनी रणशिंग फुंकले

भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक हे आपले जुने मित्र आहेत, गेल्या निवडणुकीत ते माझ्या विरोधात असले तरी, त्यावेळचे राजकारण वेगळे होते.
Sanjay Mandlik
Sanjay MandlikSarkarnama
Published on
Updated on

Shivsena-BJP Alliance News : ‘राज्यात भारतीय जनता पक्ष व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना जोमाने एकत्रित काम करत आहे. भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी विद्यमान खासदारांनाच उमेदवारी देण्याचा शब्द दिला आहे, त्यामुळे मी आगामी लोकसभा निवडणूक शिवसेनेतूनच लढवणार’, असे खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी सांगितले. (I will contest the Lok Sabha elections from Kolhapur : Sanjay Mandlik)

दरम्यान, भाजपचे (BJP) राज्यसभा खासदार धनंजय महाडिक हे आपले जुने मित्र आहेत, गेल्या निवडणुकीत ते माझ्या विरोधात असले तरी, त्यावेळचे राजकारण वेगळे होते. त्यावेळी भाजप-शिवसेनेचा (Shivsena) मी उमेदवार होता. आताही तसेच होणार असून महाडिक यांच्यासह भाजपचे लोक माझा प्रचार करतील, असा दावाही प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी यावेळी केला.

Sanjay Mandlik
Dharashiv News : गैरव्यवहाराची तक्रार देणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याला भाजप जिल्हाध्यक्षाची शिवीगाळ; पोलिसांत तक्रार दाखल

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांच्या पातळीवर या निवडणुकीची तयारी सुरू असताना भाजप-शिंदे गटाच्या हालचालींविषयी उत्सुकता आहे. या पार्श्‍वभूमीवर मंडलिक यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

Sanjay Mandlik
Solapur Politic's : मी लिहून देते, भाजपच्या लोकांना विमानसेवा सुरू करणं जमणार नाही; काडादींच्या भेटीनंतर प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल

ते म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत मी भाजपचा उमेदवार असणार ही दिशाभूल करणारी बातमी आहे. या पारावरच्या अर्थहीन गप्पा आहेत. बारामतीचे काही ज्योतिषी कोल्हापुरात आलेत का? त्यांच्याकडून अशा वावड्या उठवल्या जातात का? हे बघावे लागेल. कारण अशा चर्चा करण्यात काही अर्थ नाही. मी कोणत्याही माध्यमांशी किंवा खासगी स्वरूपातही अशी कधी चर्चा केलेली नाही. काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांचा मला फोन आलेला नाही.’

Sanjay Mandlik
KCR On Bhagirath Bhalke : भगीरथ भालकेंसाठी खास विमान का पाठविले होते?; केसीआर यांनी सांगितले कारण…

‘सन २०१९ च्या निवडणुकीत ‘आमचं ठरलंय’ म्हणून काही लोकांनी मदत केली, त्याची परतफेड मी केली आहे. आता २०२४ च्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात २०१९ पासून पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. जागांची अदलाबदल ही निवडणुकीच्या काळात होते, त्यावर आता चर्चा करणे योग्य नाही. जर-तर याला राजकारणात काही अर्थ नसतो. त्यावेळी आणि पुढील काळातही बारातमीचे ज्योतिषी येतील, पण आम्ही राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे वारस आहोत. अशा चर्चांना थारा देणार नाही, असेही प्रा. मंडलिक यांनी सांगितले.

Sanjay Mandlik
Praful Patel on Ajit pawar : 'माझे अन॒ शरद पवारांचे संबंध किती गहन आहेत, हे कळायला अजितदादांना अनेक वर्षे लागतील'

सर्व्हे कुणाचा महत्त्वाचा?

‘भाजपच्या कोणत्या विद्वानांनी अलिकडचा सर्व्हे केला, मला माहिती नाही. पण अलिकडेच एक सर्व्हे आला, त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना किती कौल दिला हे माहिती आहे. त्यामुळे सर्व्हे कुणाचा महत्त्वाचा हे यावरून स्पष्ट होते’, असा टोलाही प्रा. मंडलिक यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com