Gondawale Khurd Accident sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maan News : पंढरपूरकडे निघालेल्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात; एकाचा मृत्यू,सहा गंभीर

Umesh Bambare-Patil

-फिरोज तांबोळी

Maan News : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या भाविकांच्या गाडीचा आज सकाळी गोंदवले खुर्द (ता.माण) हद्दीत भीषण अपघात झाला. यामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले तर एकाचा उपचाराला नेताना मृत्यू झाला. कल्याण भोसले असे मृताचे नाव आहे. अपघातातील सर्वजण गुजरवाडी (ता.कोरेगाव) रहिवासी येथील आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,आषाढी एकादशी निमित्ताने कोरेगाव तालुक्यातील Koregaon गुजरवाडी येथील पैलवान व प्रगतशील शेतकरी कल्याण भोसले हे स्वतःच्या चारचाकी गाडीतुन (एमएच ११बीएच ०८९६) मित्रांसोबत पंढरपूरला Pandharpur निघाले होते.

सकाळी आठच्या सुमारास गोंदवले खुर्द हद्दीतील लोधवडे फाट्याजवळ गाडीला ओव्हरटेक करताना भोसले यांची गाडी रस्त्यावरून उंच उडाली. त्यामुळे गाडीवरील ताबा सुटून हा अपघात झाला.या अपघातात चार वेळा गाडी पलटी होऊन रस्त्यालगतच्या रिकाम्या शेतात जाऊन पडली. त्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले.

या अपघातात अण्णा गाढवे (वय 42) पपु भिसे (वय 40), दादासो थोरात (वय 42),सागर भोसले व विजय माने (वय 45), श्रीमंत पवार (वय 50) (सर्वजण रा.गुजरवाडी ता कोरेगाव ) हे गंभीर जखमी झाले. तर रुद्र भोसले (वय 13) याला किरकोळ दुखापत झाली.अपघातानंतर लोधवडे (संभाजीनगर) येथील लोकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली.

जखमींना गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर पुढील उपचारासाठी सातारा येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचाराला नेताना वाटेतच गाडी चालक व मालक कल्याण भोसले यांचा मृत्यू झाला.

दरम्यान दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन अपघाताची पाहणी करत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. अपघातानंतर गंभीर जखमी असलेल्या वडिलांसह गाडीतील जखमींना रुद्र भोसले हा मोठ्या धैर्याने मदत करत होता. मात्र या अपघातात त्याच्या वडिलांचे निधन झाले.

गोंदवले खुर्द ते लोधवडे फाट्यापर्यंतचा रस्ता धोकादायक बनला आहे. या रस्त्याचे काम सदोष असल्यानेच याठिकाणी अनेक लहान मोठे अपघात होत असल्याची चर्चा आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात पळशी येथील तीन युवकांना जीव गमवावा लागला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT