Satara News : ती जागा माझ्या मालकीची; शिवेंद्रसिंहराजे, मार्केट कमिटीचा संबंध नाही : उदयनराजे

Udayanraje Bhosale संभाजीनगर येथील जागेवरुन उदयनराजेंनी आज संतप्त होत मार्केट कमिटीच्या नियोजित कार्यक्रमाआधी जाऊन कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

Udayanraje Bhosale News : संभाजीनगरची ती जागा माझ्या मालकीची असून, तेथे सगळी कुळे आहेत. या जागेशी मार्केट कमिटीचा काहीही संबंध नाही. पोलिस खाते शिवेंद्रसिंहराजेंच्या दबावाखाली एकतर्फी काम करत आहे. माझ्या जागेत शेड कशासाठी? माझ्या जागेत पाय ठेवायचा त्यांना अधिकार नाही, असा सज्जड दम भरत आम्ही वरिष्ठ वकिलांशी चर्चा करून मार्केट कमिटीवर व पोलिसांवर ट्रेस पासिंग आणि न्यायालयाचा अवमान केल्याबद्दलची केस दाखल करणार, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.

उदयनराजे Udayanraje Bhosale म्हणाले, ‘‘ही माझ्या मालकीची जागा असून, येथे कुळ असून त्यांची जागा आहे. अचानक या लोकांना दृष्टांत झाला. त्यांना वाटले, की या जागेचा कब्जा घ्यावा. संपूर्ण पोलिस विभाग मार्केट कमिटीच्या बाजूने व शिवेंद्रसिंहराजेंच्या Shivendraraje Bhosale दबावाखाली चालत आहे. माझ्या जागेत पाय ठेवायचाही त्यांना अधिकार नाही. माझ्या जागेत पाय ठेवल्यास तंगडे तोडणार आहे.

मार्केट कमिटीने बैल बाजार विकून टाकला. लोकांच्या जागा घ्यायच्या. प्लॉटींग करून विकून टाकायची, हे त्यांचे काम आहे. त्याकाळी अभयसिंहराजे पालकमंत्री असल्याने ते सर्व अधिकाराचा वापर करत होते. सहकारात सर्वाधिक भ्रष्टाचार होत आहे. मोठया प्रमाणात सहकारी संस्था अडचणीत आलेल्या आहेत. भ्रष्ट अधिकऱ्यांची चेन आहे, त्यावर नियंत्रण आणले गेले पाहिजे.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Satara News : कांदाटी खोऱ्यातील तरुणांचे स्थलांतर रोखणार... एकनाथ शिंदे

आम्ही प्लॉट पाडून पैसा कमविणार, असा आरोप वारंवार होतोय. पण, त्यांना थोडी बुद्धीची उंची लागते. ती त्यांच्याकडे दुर्दैवाने नाही. तसे असते तर मी यांच्याबरोबर हात मिळवणी करुन तुम्हाला पाहिजे ते घ्या, मला माझे द्या, असे झाले असते. त्यांचा प्रस्ताव आला होता, तो मी अमान्य केला. या भागाच्या विकासासाठी ही जागा वापरली गेली पाहिजे, हे माझे प्रामाणिक मत आहे.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje - Shivendraraje Dispute: साताऱ्यात राजकारण तापलं; बाजार समितीच्या जागेवरून उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे भिडले

त्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही. पोलिसही त्यांच्या बाजूने आहेत. पोलिसांचा वापर ताबा घेण्यासाठी करत असतील तर हा नवीन पायंडा म्हणावा लागेल. न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने नाही. ते काहीही बोलतील. त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीच नाही. आम्ही कागदपत्रे दाखवली आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात ट्रेस पासिंग, कंटेम्‍पट ऑफ कोर्ट आदी केसेस दाखल करणार आहोत.’’

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Karad News : महामार्गावरील असुविधेवरून श्रीनिवास पाटलांनी धरले अधिकाऱ्यांचे कान

नारळ ठेवला, फटाके वाजविले म्हणजे भूमिपूजन झाले असे नाही. हे सगळे काळे धंदे करणारे लोक आहेत. मनवेसारखा माणूस दोन आणि तीन चार कोटींचा बंगला बांधतो. एखादा उद्योजक बंगला बांधू शकत नाही, तेवढा याचा बंगला आहे.

ही जागा प्लॉट पाडून विकायचा उदयोग असल्याचा आरोप आमदार करत आहेत, याविषयी विचारताच उदयनराजे म्हणाले, ‘‘आम्ही भूमिपूजन केलं ते लोकांच्या हितासाठी आहे. एमआयडीसीत जाऊन पाहा, निम्म्याच्यावर त्यांनी प्लॉटींग केले आहेत. आम्ही बोलत नाही, त्यांना काय बोलायचे ते बोलू देत. पण, ही जागा माझी आहे. शिवेंद्रसिंहराजे व मार्केट कमिटीचा काहीही संबंध नाही.’’

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Shiv Sena Foundation day : शिवसेनेच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतयं ; आवाज कुणाचा ? ठाकरे की शिंदे गटाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com