BJP  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

BJP News : भाजप आमदाराची निवडणूक आयोगात तक्रार देणाऱ्या बंडखोराच्या गाडीला अपघात; गंभीर जखमी नेत्यावर सोलापुरात उपचार

Mohol Accident : मोहोळजवळ महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ज्ञानेश्वर वाकडे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून समर्थकांकडून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 14 February : जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आमदाराने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार देण्यासाठी गेलेले बंडखोर नेते ज्ञानेश्वर वाकडे यांच्या गाडीला मोहोळजवळ महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात भाजपचे बंडखोर ज्ञानेश्वर वाकडे यांच्यासह तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत. वाकडेंच्या डोक्याला जबर मार लागला असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. वाकडे यांचा अपघात नसून त्यांचा घातपात करण्यात आलेला आहे, असा संशय समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे, त्यामुळे लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

ज्ञानेश्वर वाकडे हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. पत्नीला निलंगा तालुक्यातील तरवडी गटातून जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळावी, अशी मागणी वाकडे यांनी भाजपकडे केली होती. मात्र, त्यांच्या पत्नीला पक्षाने तिकिट नाकारले होते, त्यामुळे वाकडे यांच्या पत्नीने निलंगा तालुक्यातील तरवडी गटातून लातूर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती.

दरम्यान, या निवडणुकीच्या काळात भाजप आमदाराने मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्या आमदाराच्या विरोधात तक्रार देण्यासाठी ज्ञानेश्वर वाकडे हे मुंबईला गेले होते. मुंबईत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दिल्यानंतर ते आपल्या गाडीने लातूरकडे परत येत होते.

मुंबईहून लातूरकडे येत असताना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळजवळ महामार्गावर शनिवारी पहाटे वाकडे यांच्या मोटारील पाठीमागून येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. ती धडक इतकी जोरात होती की, वाकडे यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाकडे यांच्यासह गाडीतील तीन चे चार जण हे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर स्थानिकांनी तसेच माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी सोलापुरातील रुग्णालयात दाखल केले आहे. वाकडे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

ज्ञानेश्वर वाकडे यांचा अपघात नसून घातपात आहे, असा संशय त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत, त्यामुळे लातूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबड उडाली आहे. पोलिसांनी अपघातस्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT