Rahul Narvekar viral Video : नार्वेकरांनी पळ का काढला?; तुम्ही सांगताय की मी सांगू?; विधानसभा अध्यक्षांचा व्हिडिओ व्हायरल करत संजय राऊतांचा सवाल

Sanjay Raut Post Video : संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करत व्हिडिओ पोस्ट केला. या प्रकारामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून राजकीय चर्चांना वेग आला आहे.
Rahul Narvekar-Sanjay Raut
Rahul Narvekar-Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 14 February : राज्याच्या राजकारणात दररोज नवनव्या घडामोडी पुढे येताना दिसत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडिओ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकर पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे, तुम्ही सांगताय की मी सांगू? असा सवालही नार्वेकरांना विचारला आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar ) यांचा व्हिडिओ खासदार संजय राऊत यांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून व्हायरल केला आहे. तो शेअर करताना राऊतांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. विधानसभा अध्यक्षांसोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे. तुम्ही सांगताय की मी सांगू? असे सवालही राऊतांनी विचारले आहेत.

दरम्यान, संजय राऊतांनी (Sanjay Raut) पोस्ट केलेल्या व्हिडिओतील संवादानुसार नार्वेकर हे पाईंट काहीच नाही, तू चल रे असे एकाला म्हणताना दिसत आहेत. संबंधित ग्रामस्थ हे व्हिडिओ कर तू, तू व्हिडिओ कर, असे सांगताना दिसून येत आहेत. या दोघांचा कर. नार्वेकर यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीला एक पुरुष त्या महिलेला ‘तू मार याला’ असेही बोलत आहे.

साखरपुडा होता, त्यावेळी तुम्ही आला होता. आम्ही घरात नाही ही संधी साधून घरात शिरता का तुम्ही? आतमध्ये बसायला येऊ नको, असं तुला सांगितलं होतं ना, असेही तो ग्रामस्थ नार्वेकरांसोबत आलेल्या व्यक्तीला विचारताना दिसत आहे. त्यावर तो मी काहीच केलेले नाही, तुमच्याशी चांगलं बोललो, असे उत्तर तो कार्यकर्ता देत आहे.

Rahul Narvekar-Sanjay Raut
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री, पक्षाध्यक्षानंतर सुनेत्रा पवारांवर आणखी एका मोठ्या संस्थेची जबाबदारी येणार

आमची एवढी जागा गेली तर काय नाही. त्यावर विधानसभा अध्यक्ष संबंधित ग्रामस्थांना, ऐका भांडणं करू नका. सरकारी काम करत असेल तर त्यांना करू देत, असं समजावून सांगताना दिसत आहेत. पण ग्रामस्थ ऐकत नाहीत म्हटल्यावर नार्वेकर यांनीही तिथून काढता पाय घेऊन निघून गेल्याचे स्पष्ट होत आहे.

Rahul Narvekar-Sanjay Raut
Narendra Modi News: ना खाऊंगा, ना खाने दूंगा! सरकारी बाबू चिरीमिरी घेण्यात अद्यापही सुसाटच! भष्ट्राचारात भारत कितव्या क्रमांकावर?

हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचा व्हिडिओ आपल्या सोशल अकाउंटवरून शेअर केला आहे. त्यात त्यांनी अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दादागिरी करून शेतीमध्ये मोजणी करण्याचे काम करत होते. स्थानिक शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे नार्वेकर यांना अक्षरशः पळ काढावा लागला, असा आरोप केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com