Bandatatya Karadkar
Bandatatya Karadkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राजकीय नेत्यांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या बंडातात्या कराडकरांवर गुन्हा दाखल

सरकारनामा ब्युरो

सातारा: राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर विविध स्तरातून टीका केली जात आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपसह काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही या निर्णयावरून सरकारवर टीकेची झोड उठवली. कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनीही साताऱ्यात 'दंडवत दंडुका' या आंदोलनाद्वारे सरकारच्या वाईन विक्रीबाबतच्या निर्णयाचा विरोध केला आहे. त्यांनी राजकीय नेत्यांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.

राजकीय व्यक्तींबाबत केलेल्या बंडातात्यांनी केलेल्या विधानामुळे त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी माफी मागितली. आता त्यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात जमाव बंदी आदेश डावलून जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेकायदेशीर आंदोलन करणे, कोविडचे नियम न पाळता आंदोलन करणे, मास्क बाबत वेगळी चिथावणी देणे या कलमांखाली बंडातात्या कराडकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडातात्यांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भडकाऊ भाषण केल्याचीही नोंद तक्रारीत करण्यात आली असल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली.

नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेली आहेत. हे सांगताना त्यांनी काही जणांची नावं घेतली. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा. तसंच आपण नावं घेतली आहेत आणि त्यांनी पुरावा मागितलं तर सिद्ध करु शकतो असंही म्हणाले.

''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरळमार्गी आहेत, मात्र ढवळ्याशेजारी पोवळा बांधला आहे,'' असे ते म्हणाले. ''ढवळ्या शेजारी बांधळा पवळ्या, वाण नाही पण गुण लागला, अशी म्हण आहे. उद्धव ठाकरे यांना अजित पवारांचा गुण लागल्याने सरकारने दारू विक्रीचा निर्णय घेतला,' असं बंडातात्या कराडकर यांनी म्हटलं आहे.

शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी कराडकर यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. कराडकर स्वत:ला कीर्तनकार म्हणवतात आणि अशाप्रकारे स्त्रीत्वाचे धिंडवडे काढतात. हे खपवून घेतले जाणार नाही. त्यांनी जाहीररित्या माफी मागावी, अशी मागणी केली तर, खासदार नवनीत राणा यांनीही कराडकरांना सुनावले आहे. त्या म्हणाल्या की, आम्ही वाईनच्या विरोधात आहोत. या निर्णयावर महाराष्ट्रातील आम्ही सगळ्या महिला विरोधात आहोत. मात्र, कराडकरांचे महिलांबाबतचे हे वक्तव्य खपवून घेणार नाही, असा इशारा राणा यांनी दिला आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनीही बंडातात्यांनी माफी मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT