नाशिक : नाशिक मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे (dr. Suvarna Waje) मृत्यूचे गूढ उकलले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांना दहाव्या दिवशी ही मर्डर मिस्ट्री सोडविण्यात यश आले आहे. डॉ. वाजे यांचा खून संशयित मुख्य आरोपी पती संदिप वाजे (Sandeep Waje) याने कट रचून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. कुटुंबातील वादातून पती संदीप वाजे याने थंड डोक्याने कट रचून डॅा. सुवर्णा वाजे यांची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.
कारमध्ये जळालेल्या अवस्थेत सापडलेला सांगाडा डॉ. सुवर्णा वाजे यांचाच असल्याचा अहवालसुद्धा पोलिसांना फॉरेन्सिक लॅबकडून प्राप्त झाला आहे. पोलिसांनी वाडीवर्र्हे पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल केला असून, पती संदिप वाजे यास अटक केली आहे. त्या बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पतीने दाखल केली होती.
रात्री उशिरा पोलिसांना एका जळालेल्या कारमध्ये त्यांच्या मृतदेहाचे अवशेष सापडले. ही घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली असून, घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. कारमध्ये जळालेल्या अवस्थेत सापडलेला सांगाडा डॉ. सुवर्णा वाजे यांचाच असल्याचा अहवालसुद्धा पोलिसांना फॉरेन्सिक लॅबकडून प्राप्त झाला आहे. पोलिसांनी वाडीवर्र्हे पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल केला असून, पती संदिप वाजे यास अटक केली आहे.
सुवर्णा वाजे या मंगळवारी (२५ जानेवारी) ४ वाजता रुग्णालयात जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर रात्री ९ वाजून गेल्यानंतरही त्या घरी परत आल्या नाही. पत्नी (सुवर्णा वाजे) घरी न आल्यानं त्यांच्या पतीने त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तसेच मेसेजही केला. मेसेजला सुवर्णा वाजे यांच्या मोबाईलवरून रिप्लाय करण्यात आला.
'मी कामात आहे. वेळ लागेल,' असा रिप्लाय आला. त्यानंतर मोबाईल स्विच ऑफ आला, अशी माहिती त्यांच्या पतीने दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास नाशिक-मुंबई महामार्गावरील वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रायगडनगर परिसरात जळालेल्या कारमध्ये महिलेचा मृतदेह सापडला.
सुवर्णा वाजे या नाशिक मनपाच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. सकाळी कामावर गेलेल्या सुवर्णा वाजे रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या पतीने पोलीस ठाण्यात धाव घेत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. याचदरम्यान जळालेल्या अवस्थेत एक कार पोलिसांना सापडली आणि त्या जळालेल्या कारमध्येच त्यांच्या जळून खाक झालेल्या मृतदेहाचे अवशेष आढळून आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.