Solapur, 10 October : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे सध्या सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू आहे. मात्र, या आचारसंहितेच्या काळात मोफत शिलाई मशिन आणि अन्नधान्याचे वाटपाचा कार्यक्रम घेणे एमआयएम पक्षाचे पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभाग अध्यक्ष आणि सूरज सोशल ग्रुपचा पदाधिकारी शाहजूर अजिज चौधरी (वय २८, रा. मौलाली चौक, सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एमआयएम पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्याविरोधात उत्तर सोलापूर पंचायत समितीमधील कल्याण श्रीवस्ती यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात आचारसंहिता भंगाची फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
शाहजूर चौधरी यांनी २७ सप्टेंबर रोजी सोलापूर शहरातील मौलाली चौकात विनापरवाना मोफत शिलाई मशीन वाटप, अन्नधान्य वाटप आणि आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासंदर्भात ४ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती.
तक्रारींसोबत कार्यक्रमाची छायाचित्रेही जोडण्यात आली होती. त्यात एआयएमआयएम पक्षाचा बॅनर आणि नेत्याचे छायाचित्र वापरल्याचे दिसून आले आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता चालू असताना मोफत शिलाई मशीन आणि अन्नधान्याचे वाटप करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्या माध्यमातून आचारसंहितेचा भंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी उत्तर सोलापूर पंचायत समितीतील कल्याण श्रीवस्ती यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात आचारसंहिता भंगाची फिर्याद दिली आहे. त्यावरून कार्यक्रमाचे आयोजक शाहजूर चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार बाळू जाधव तपास करीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.