

Satara, 09 October : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदी खासदार उदयनराजे भोसले यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. उदयनराजेंच्या या बिनविरोध निवडीमध्येही एक विक्रम घडला असून तीनही वेळेला विरोधक म्हणून एकाच नेत्याने अर्ज भरला आणि माघार घेतली आहे, त्यामुळे उदयनराजेंच्या बिनविरोध निवडीची आणि माघारीची हॅट्ट्रीक झाली आहे.
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी गृहनिर्माण आणि दुग्ध संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांच्या विरोधात या मतदारसंघातून डी. के. पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला हेाता. मात्र, अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी पवार यांनी आपला अर्ज मागे घेतला, त्यामुळे उदयनराजेंची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे.
उदयनराजेंच्या बिनविरोध निवडीमध्ये एकाच व्यक्तीने तिसऱ्यांदा अर्ज मागे घेतल्याने एक प्रकारचा इतिहास घडला आहे. त्याबाबत उदयनराजेंच्या सत्काराच्या कार्यक्रमात त्याबाबत खुद्द डी. के. पवार आणि महायुतीचे समन्वयक सुनील काटकर यांनी त्याबाबत भाष्य केले आहे, त्यामुळे बिनविरोध निवड होणारे उदयनराजे अन् माघार घेणारे डी. के. पवार यांनी इतिहास निर्माण केला आहे.
गादीचा मान अन् आदर....
तिसऱ्यांदा माघार घेणारे डी. के. पवार यांचा या मेळाव्यात सत्कार करण्यात आला. त्या सत्काराला उत्तर देताना पवार म्हणाले, ‘सातारा जिल्हा बँक ही देशातील आदर्श बँक आहे. छत्रपती उदयनराजेंसाठी मी स्वतःचा अर्ज मागे घेण्याची ही सलग तिसरी वेळ असून माझी माघारी 'हॅटट्रिक' झाली आहे. आदरापोटी आणि गादीचा मान राखण्यासाठी मी हा निर्णय घेतला. राजघराण्यात जन्माला आलेल्या या लोकनेत्याचा इतिहास समृद्ध करण्याचे भाग्य माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मिळाले, याचा मला सार्थ अभिमान आहे.
तो मान डी. के. पवारांना...
महायुतीचे समन्वयक सुनील काटकर म्हणाले, सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सभासदांच्या विश्वासावर खासदार उदयनराजेंची बिनविरोध निवड झाली आहे. तिसऱ्यांदा निवड होत असताना तीनही वेळेला अर्ज मागे घेण्याचा मान डी. के. पवार यांना मिळाला, त्यामुळे 'तीन' हा आकडा आपल्या सर्वांसाठी लकी ठरला आहे. राजकारणातील जोडे बाजूला ठेवून शेतकरी आणि सभासदांच्या हितासाठी ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, हाच विचार सर्वांनी मांडला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.