Madan Bhosale, Amit Shah, Devendra Fadanvis sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

`किसन वीर`चा प्रश्न अमित शहांच्या कानावर : फडणविसांची मध्यस्थी कामी येणार का?

मदन भोसले Madan Bhosale यांनी मंत्री अमित शहा Amit Shah यांचे आभार Thanks मानले आहेत. तसेच किसन वीर Kisan veer आर्थिक गर्तेतून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Umesh Bambare-Patil

सातारा ः किसन वीर साखर कारखान्याला थकित एफआरपीसह इतर देणी तसेच कर्ज पुनर्वसनासाठी मदत मिळावी यासाठी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष मदन भोसले यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत जाऊन आज दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यासंदर्भातील एनसीडीसीचा त्यांनी शहा यांच्याकडे दिला. या प्रस्तावाची तत्काळ छाननी करून उचित कार्यवाही करण्याचे आदेश मंत्री शहा यांनी दिले आहेत.

किसन वीर साखर कारखान्याची निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून विद्यमान अध्यक्ष मदन भोसले यांचे पॅनेल रिंगणात आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे वाईचे आमदार मकरंद पाटील यांचे पॅनेल आहे. निवडणूक लागल्यापासून मदन भोसले विरोधकांना एक एक धक्का देत असून सभासदांना आपलेसे करण्यासाठीचे प्रयत्न सातत्याने करत आहेत. कारखाना आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्याचे त्यांचे प्रयत्न निवडणुकीच्या रिंगणात राहूनच सुरू आहेत. त्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आहे.

आज त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत दिल्लीत जाऊन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी किसन वीर साखर कारखान्याला थकित एफआरपीसह इतर देणी तसेच कर्ज पुनर्वसन व मदतीसाठी एनसीडीसीचा प्रस्ताव केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे सादर केला.

यावेळी त्यांनी किसन वीरला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी मदत मागीतली. यावेळी अमित शहा यांनी यासंदर्भात प्रस्तावाची तत्काळ छाननी करून उचित कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. याबद्दल मदन भोसले यांनी मंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. किसन वीर आर्थिक गर्तेतून बाहेर पडण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी कामी येणार का, याची उत्सुकता बाकी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT