Kolhapur News, 24 Aug : चंदगडमधील हाजगोळी येथे झालेल्या एमडी ड्रग्स कारखान्याच्या कारवाईच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनासह राज्यातील पोलीस प्रशासन हादरले आहे. एमडी ड्रग्स कारवाईच्या तपासात याचे कनेक्शन थेट दाऊद इब्राहिम टोळीचा कमी एक्का असलेल्या सलीम डोला याच्यासोबत असल्याचे उघड झाले आहे.
नयानगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान अटक केलेल्या इरफान सलीम खान (मीरा रोड, ठाणे) याच्याकडून मिळालेल्या माहितीतून हाजगोळीतील हा प्रकार समोर आला होता. हाजगोळी पोल्ट्रीवरील छाप्यात सव्वा कोटींचे साहित्य जप्त चंदगड हाजगोळी (ता. चंदगड) येथील पोल्ट्री फार्ममध्ये एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्ज तयार करण्याचा कारखाना पुणे येथील अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने शनिवारी (ता. २२) उद्ध्वस्त केला.
रात्री उशिरापर्यंत झडती घेण्याचे काम सुरू होते. या कारवाईत सुमारे २०८ ग्रॅम तयार एमडी, कच्चे रसायन, रासायनिक पावडर, विविध उपकरणांसह तब्बल १ कोटी १३ लाख ५१ हजार ४८० रुपयांचे साहित्य जप्त केले. दाऊद इब्राहीम सलीम डोला सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ड्रग्ज पुरविणाऱ्या डोला याला इस्तंबूलमधून अटक झाली आहे. त्याच्यासाठी भारतात कारखाने उभारून अमली पदार्थ बनविणाऱ्या दया ऊर्फ दयानंद मुद्दनारचा शिष्य इरफान सलीम खान (रा. मीरारोड, ठाणे) यानेच चंदगडची निवड केल्याचे उघड झाले. दयाचा आठ दिवसांपूर्वीच मुंबईतील जे. जे. रुग्णालयात मृत्यू झाला.
मात्र, त्याने पेरलेल्या विषारी रोपट्याची मूळे थेट कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याने एक नवा धोका निर्माण झाला आहे. एप्रिल २०२६ मध्ये ठाण्यातील नयानगर पोलिसांनी फिर्दोस नावाच्या महिलेकडून दीड किलो एमडी ड्रग्ज जप्त केले होते. चौकशीत कुख्यात इरफान सलीम खान याचे नाव समोर आले. त्यानंतर तपास अमली पदार्थ विरोधी 'टास्क फोर्स'कडे सोपविण्यात आला. या पथकाने सखोल अभ्यास केला असता अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
देशभर कारखान्यांसाठी अर्थसहाय्य मीराभाईंदर येथील गुन्ह्याच्या तपासात सांडेला (उत्तर प्रदेश), जहिराबाद (तेलंगण) व मालवणी (मुंबई) येथील कारखान्यांची नावे समोर आली. तेथील छाप्यांत सुमारे २० जणांना पकडण्यात आले. तर २० कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
कोल्हापूरच्या दुर्गम भागाची निवड मुंबई, पुणे, ठाण्यात कारवायांचा धडाका सुरू झाल्याने, तपास यंत्रणांच्या नजरेतून सुटण्यासाठी संशयितांनी कोल्हापूर आणि गोव्यापासून जवळचा दुर्गम असा चंदगडचा भाग निवडला. पावसाळ्यात या भागात वाहने फिरकत नसल्याचा फायदा घेत याच परिसरातह परिसरात हा कारखाना थाटल्याचे उघड झाला होता. हाजगोळी येथील पप्पू विठ्ठल मलतवाडकर यांच्या मालकीच्या पोल्ट्री फार्ममध्ये अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना सुरू करून त्याची निर्मिती केल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास अमली पदार्थविरोधी पथकाकडून सुरू असून, संपूर्ण साखळी आणि अन्य सहभागींचा शोध घेतला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.