NCP Reshuffle : पक्ष मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी 'भाकरी' फिरवणार; पक्षाच्या बैठकीत नेत्यांचं एकमत, प्रशांत किशोर पुन्हा चर्चेत...

NCP party restructuring : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली वरळी येथे पक्षाची सुमारे साडेतीन तास बैठक झाली. आगामी जिल्हा परिषद निवडणुका सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने लढण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
NCP
NCPSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 23 Aug : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक फेरबदलाची तयारी सुरू केली आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच नव्या चेहऱ्यांना संधी देणे, तरुणांना विशेषतः 'जेनझी'ला संघटनेत अधिक प्रतिनिधित्व देणे आणि पक्ष व सरकारमधील समन्वय वाढविण्यावर शनिवारी झालेल्या बैठकीत भर देण्यात आला.

आगामी जिल्हा परिषद निवडणुका सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने लढण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली वरळी येथे पक्षाची सुमारे साडेतीन तास बैठक झाली. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसह आगामी निवडणुकांच्या रणनीतीवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

संघटनेत व्यापक फेरबदल करताना विविध समाजघटकांतील प्रभावशाली कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबतही नेत्यांनी भूमिका मांडली. पक्ष संघटनेच्या पुनर्रचनेत राज्यसभा खासदार पार्थ पवार सक्रिय झाले आहेत. नव्या आणि तरुण चेहऱ्यांना पक्षाच्या संघटनेत स्थान देण्याबरोबरच ‘जेनझी’ मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी संघटनेत त्यांना अधिक प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या संघटनात्मक रचनेत मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, पक्षाच्या शिस्तभंग कारवाई समितीचे प्रमुख जय पवार, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

दरम्यान, पक्षातील कथित मतभेदांच्या चर्चांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी फेटाळून लावले. संघटनात्मक मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली असून पक्षात कोणतेही मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या संघटनात्मक फेरबदलाच्या हालचालींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे.

NCP
Panama Cargo Ship Sinks : बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडालं; 24 खलाशी बेपत्ता, भारतीय नौदलाकडून बचावकार्य सुरू

प्रशांत किशोर पुन्हा चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेससाठी रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांची नियुक्ती होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी पार्थ पवार यांची भेट घेऊन पक्षाच्या संघटनात्मक पुनर्रचनेबाबत चर्चा केल्याचे सांगितले जाते. पक्षात फेरबदल करण्याची शिफारसही त्यांनी केल्याची माहिती आहे. मात्र, या भेटीमुळे भाजपच्या गोटात नाराजी व्यक्त झाल्याची चर्चा होती.

NCP
BJP Gen-Z Strategy : राहुल गांधींची 'छात्रों की गूंज' सुरू असतानाच भाजपचा Gen-Z साठी मास्टरप्लॅन! पक्षाच्या बैठकीत 'त्या' 10 मुद्द्यांच्या ठरावाला मंजुरी

मात्र, तरीही आता राष्ट्रवादीच्या संघटनात्मक पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांची भूमिका पुन्हा चर्चेत आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी संघटनेत नेमके कोणते बदल होणार प्रशांत किशोर यांची पक्षाचे रणनीतीकार म्हणून निवड केली जाणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com