Uddhav Thackeray, Chandrahar Patil, Vishal Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Politics : चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित; सांगलीवरून आघाडीत वादाची ठिणगी!

Rahul Gadkar

Sangli Lok Sabha Constituency Politics :

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून लोकसभा निवडणूक लढण्याचे ध्येय ठेवून तयारीला सुरुवात केली आहे. मात्र, कोणत्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, याबाबत स्पष्टता दिली नव्हती. आता चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन काँग्रेसच्या विशाल पाटील यांच्या अडचणीत वाढ केली आहे.

कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला (ठाकरे गट ) द्यावा, अशी भूमिका Uddhav Thackeray गटाने घेतल्यानंतर चंद्रहार पाटलांना मातोश्रीवर बोलवण्यात आले होते. झालेल्या चर्चेनंतर महाविकास आघाडीकडून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र, त्यावर बुधवारी अंतिम निर्णय होणार आहे.

चंद्रहार पाटील यांनी मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर जाऊन भेट घेतली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस लढवणार असल्याचे निश्चित होत असताना सांगली लोकसभा मतदारसंघ जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, बुधवारी यावर अंतिम चर्चा होणार असली तरी ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्याकडून आढावा घेतला.

चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सांगलीतून शिवसेनेकडून चंद्रहार पाटलांच्या नावाला समंती दर्शवली असल्याची माहिती आहे. वंचित बहुजन आघाडीनेही चंद्रहार पाटील यांना पाठिंबा देत सांगली लोकसभा मतदारसंघातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने महायुतीपेक्षा महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेसचे विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून तयारी ठेवली आहे. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अनेक कार्यक्रम घेऊन वातावरण निर्मिती केली आहे. आता काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्यास महाविकास आघाडीत वाद निर्माण होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT