Sanjay Raut On Shahu Chhatrapati : "छत्रपतींनी हाती मशाल धरली तर....", संजय राऊतांचं मोठं विधान

Sanjay Raut On Kolhapur Lok Sabha : "कोल्हापूर लोकसभेची जागा सोडू नये, यासाठी आमच्यावर दबाव आहे," असं राऊतांनी सांगितलं.
sanjay raut shahu chhatrapati
sanjay raut shahu chhatrapatisarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावरून ( Kolhapur Lok Sabha Election 2024 ) काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात चढाओढ लागली आहे. काँग्रेसकडून कोल्हापूरच्या जागेवर दावा सांगण्यात येत आहे. अशातच खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी शिवसेनाच कोल्हापुरातून लढणार असल्याचं ठामपणे सांगितलं आहे. तसेच, शाहू छत्रपती ( Shahu Chhatrapati ) यांनी हाती मशाल धरली, तर महाराष्ट्र उजळून निघेल, असं मोठं विधानही संजय राऊतांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

sanjay raut shahu chhatrapati
Loksabha Election 2024 : उद्धव ठाकरेंना लोकसभेआधी शिंदे गट देणार नाशिकमध्ये धक्का?

संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले, "कोल्हापूरची जागा शिवसेनेनं जिंकली आहे. महाविकास आघाडीत जिंकलेल्या जागांवर चर्चा करायची नाही, हे सूत्र ठरलेलं आहे. श्रीमंत शाहू छत्रपती ( Shahu Chhatrapati ) यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. सगळ्यांनी मिळून महाराजांना राज्यसभेवर पाठवावं ही शिवसेनेची भूमिका तेव्हाही होती आणि आजही आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"लोकसभा लढवण्याबाबत शाहू महाराजांबरोबर ( Shahu Chhatrapati ) चर्चा झाली नाही. ही जागा शिवसेनेची असल्यानं सगळ्यांनी मिळून शाहू महाराजांशी बोलण्याचं ठरवलं आहे. गेल्या 30 वर्षांपासून आम्ही कोल्हापूर लोकसभेची ( Kolhapur Lok Sabha ) जागा लढवतोय. या मतदारसंघात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. ही जागा सोडू नये, यासाठी आमच्यावर दबाव आहे," असं राऊतांनी सांगितलं.

sanjay raut shahu chhatrapati
Lok Sabha Election 2024 : शेट्टींचा स्वबळाचा नारा; 'महाविकास'कडून प्रतीक पाटील यांचे नाव 'फायनल'?

"छत्रपतींनी हाती मशाल धरली तर महाराष्ट्र उजळून निघेल. आम्ही शाहू महाराजांना आणि त्यांच्या विचारधारेला मानतो. ही जागा शिवसेनेकडे असल्यानं कुठून लढावं? हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. जर शाहू महाराज निवडणूक लढणार असतील, तर महाविकास आघाडीत आम्ही त्यावर चर्चा करू," असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

R

sanjay raut shahu chhatrapati
Dhairyashil Mane News : मानेंच्या बॅनरवर विकासकामांची माहिती देण्यासाठी 'क्यू आर कोड', पण उघडली भलतीच वेबसाइट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com