Chandrahar Patil Join Eknath Shinde Shivsena sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandrahar Patil: '...म्हणून चंद्रहार पाटलांनी ठाकरेंची साथ सोडली अन् शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला!'; 'या' मंत्र्यांचा मोठा दावा

Chandrahar Patil Joins Eknath Shinde Shiv Sena: लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी ज्यांच्यासाठी जोर लावला त्याच चंद्रहार पाटलांनी सोमवारी यांनी अधिकृतरित्या धनुष्यबाण हाती घेतला. त्यांनी आता अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश करत एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलं आहे.

Deepak Kulkarni

Thane News : अखेर सांगलीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) सोडत शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. अखेर या चर्चांना सोमवारी पूर्णविराम मिळाला. आता त्यांच्या पक्षप्रवेशाला काही तास होत नाही, तोच फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यानं मोठा दावा केला आहे.

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी ज्यांच्यासाठी जोर लावला त्याच चंद्रहार पाटलांनी सोमवारी (ता.9) यांनी अधिकृतरित्या धनुष्यबाण हाती घेतला. त्यांनी आता अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश करत एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलं आहे. यावेळी त्यांनी आपण पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचं म्हटलं होतं. अशातच आता शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी मोठं विधान केलं आहे.

आबिटकर म्हणाले,त्यांचे मी पक्षात स्वागत करतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कामाची भुरळ पडल्यानं शिवसेनेत अनेकांचे पक्षप्रवेश होत आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कामाची भुरळ नवीन येणाऱ्यांचे स्वागत आहे. शारंगधर देशमुखांसह आणखी काहीजण येणार आहेत, असं स्पष्ट करत ऑपरेशन टायगर सुरूच राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.

शारंगधर देशमुख यांनी रविवारी (ता.8) त्यांनी भेट घेतली होती. भविष्यात संघटन दृष्टीने अनेकजण शिवसेनेत दाखल होत असल्याचंही आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले. पण या पक्षप्रवेशामागं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कामाची भुरळ असल्याचंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं.

चंद्रहार पाटील नेमकं काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभेचे पराभूत उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी शिवसेना पक्षप्रवेश झाल्यानंतर संवाद साधला. यावेळी ते म्हणाले,माझ्या पक्षप्रवेशासाठी ज्यांनी अट्टहासाने प्रयत्न केले. मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली काम करावे,अशी राम रेपाळे, शरद कणसे काका यांची इच्छा होती. त्यांचेही आपण आभार मानत असल्याचं म्हटलं.

सांगलीचा ढाण्या वाघ आता खऱ्या जंगलात....

चंद्रहार पाटलांच्या पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सांगलीची माणसं चांगली असतात. चंद्रहार पाटील आज आपल्या पक्षात आले.मी तुमची अगोदरची जागा चुकली असं म्हणणार असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला. तसेच शेतकऱ्याच्या मुलाला पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकजूट केली,असंही तुम्ही सांगितलं.

पण मीदेखील एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे.मी मुख्यमंत्री झाल्याचे अनेकांना पचनी पडलेलं नाही. सांगलीचा ढाण्या वाघ आता खऱ्या जंगलात आला आहे, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार पायी तुडवले, त्यांना आता त्या कृतीची प्रचिती आली आहे. माझ्या पक्षात कोणीही नोकर नाही,मालक नाही. जो काम करेल तो पुढे जाईल,असे सांगत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना काम करत राहण्याचीही सूचना केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT