म Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandrakant Patil : निवडणूक कधी होणार? चंद्रकांत पाटील यांनी आचारसंहितेची तारीख सांगितली

Roshan More

Chandrakant Patil : लोकसभेच्या निकालाने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. तर, लोकसभेत बससेल्या फटक्यामुळे महायुती सावध पाऊले टाकत आहे. अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडत महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न महायुती करत आहे. मात्र, निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार याची तारखीच मंत्री चंद्रकात पाटील यांनी जाहीर केली आहे.

कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना करताना 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागू होईल, असे मंत्री चंद्रकात पाटील म्हणाले. ते सोलापूरमध्ये बोलत होते.

डीपीडीसीच्या खर्च विषयी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी 31 ऑगस्टपर्यंत वर्क ऑर्डर काढण्याचे आदेश दिला आहे. तसेच 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागू होईल, असे गृहीत धरून काम करण्यास सांगितले आहे.

ठाकरेंवर टीका

उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे. बाळासाहेब, प्रबोधकार यांच्या घरातील माणसाने असे शब्द बोलणे लोकांना आवडणार नाही. अमित शाह हे आमचे नेते नाहीत पालक आहेत सुरुवात करणाऱ्यांनी हे थांबवले पाहिजे, असे पाटील म्हणाले.

जागा वाटपावर चर्चा

ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यत आहे. त्यामुळे महायुतीमध्ये कोण किती जागा लढवणार यावर चर्चा होते आहे. एकनाथ शिंदे गटाकडून 100 जागांची मागणी करण्यात आली आहे. तर, अजित पवार गट 80 जागांची मागणी करत असल्याची चर्चा आहे. स्थानिक भाजप नेत्यांनी भाजपने विधानसभेला 150 पेक्षा कमी जागा लढू नये, असा आग्रह धरल्याचे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT