Video Prakash Ambedkar : कुणबी मराठ्यांना मतदान करु नका, त्यांची पाटीलकी जागी झाली तर...; आबेडकरांचं खळबळजनक विधान

Prakash Ambedkar On Maratha Candidate : प्रकाश आंबेडकरांनी मराठा उमेदवारांबाबत उघड उघड विरोधाची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता त्यांनी विधानसभेला मराठा उमेदवारांना मतदान करु नका, असं आवाहन केलं आहे.
Prakash Ambedkar, Manoj Jarange Patil
Prakash Ambedkar, Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Prakash Ambedkar On Maratha Candidate : 'या निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका, विधानसभेत ठरावाच्या वेळी कुणबी समाजाची पाटीलकी जागी झाली तर ते आपल्या बाजूने मतदान करणार नाहीत. असं खबळजनक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे.

प्रकाश आंबेडकर हे आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने विविध जिल्ह्यांमध्ये सभा घेत आहेत. या सभेत बोलताना त्यांनी सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये, या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला तीव्र विरोध केला आहे.

शिवाय सगेसोयऱ्यांना कुणबी दाखले देण्याच्या मागणीलाही त्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आता आंबेडकर विरुद्ध जरांगे असा नवा वाद सुरु होतो की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, आता प्रकाश आंबेडकरांनी मराठा (Maratha) उमेदवारांबाबत उघड उघड विरोधाची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

कारण त्यांनी विधानसभेला मराठा उमेदवारांना मतदान करु नका, असं आवाहन केलं आहे. वाशिममधील पोहरादेवी येथील भाषणात बोलताना आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, "या निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका. विधानसभेत ठरावाच्या वेळी कुणबी समाजाची पाटीलकी जागी झाली तर ते आपल्या बाजूने मतदान करणार नाहीत. त्यामुळे यापुढे ओबीसी समाजाने कुणबी सोडून इतर ओबीसी उमेदवाराला मतदान केलं पाहिजे."

Prakash Ambedkar, Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : "फुकट धमक्या देऊ नये, अन्यथा कोकणात सुद्धा फिरून देणार नाही," जरांगे-पाटलांचा नारायण राणेंना इशारा

तसंच, इथला कुणबी मराठा डबल भूमिका घेतो. आपल्यामध्ये बसला की स्वत:ला ओबीसी म्हणवतो आणि पाटलांमध्ये बसला की मराठा म्हणतो. त्यामुळे या निवडणुकीत खूणगाठ बांधा मी ओबीसीलाच मतदान करणार, असं आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केलं.

कुणबी मराठ्यांपासून सावध रहा

दरम्यान, यवतमाळमधील सभेत बोलताना त्यांनी आणखी एक खबळजनक वक्तव्य केलं होतं. कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत, त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा. सभागृहात 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत. तर फक्त 11 ओबीसी आमदार आहेत. कुणबी स्वत:ला ओबीसी म्हणत असले तरी ते सभागृहात मराठ्यांसोबत आहे म्हणतो.

Prakash Ambedkar, Manoj Jarange Patil
Narayan Rane On Jarange Patil: 'मराठवाड्यात जाणार अन्...' नारायण राणे विरुद्ध मनोज जरांगे वाद पुन्हा पेटणार

मात्र, तो धनगर, माळी वंजारी लिंगायतांबरोबर नसतो. म्हणून त्यांच्यापासून सावध रहा. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धोका आहे का तर 100 टक्के धोका असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता आंबेडकरांच्या या वक्तव्यावर मराठा नेते काय भूमिका काय घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com