Chandrakant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena and BJP : चंद्रकांत पाटलांच्या दाव्याला शिंदेच्या शिवसेनेचं आव्हान; कोल्हापूर, हातकणंगलेवरून रस्सीखेच!

Chandrakant Patil and Vijay Shivatare : माजी मंत्री विजय शिवतारेंनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना या दोन्ही जागा शिवसेनेकडेच (शिंदे गट) असतील, असं सांगितलं होतं.

Rahul Gadkar

Kolhapur, Hatkanangle Loksabha News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये खडाजंगी सुरू आहे. आतापर्यंत कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे (शिंदे गट) विद्यमान खासदार असल्याने दोन्ही जागा शिवसेनेकडे राहतील अशी चर्चा होती.

तर उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी कोल्हापूर किंवा हातकलंगले लोकसभा मतदारसंघ हा भाजपला मिळणार असल्याचा दावा केला होता. त्या दाव्याला आता शिवसेना(शिंदे गट) कडूनही आव्हान देण्यात येत आहे.

शिवसेना नेते माजी मंत्री विजय शिवतारे हे नुकतेच कोल्हापूर दौऱ्यावर येऊन गेले. यावेळी दोन्ही मतदारसंघातील जागा कोणाकडे राहणार याचा स्पष्ट खुलासा करून गेले आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू झाल्याचे दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्ह्यातील दोन्हीही विद्यमान खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्‍वाखालील शिवसेनेचे आहेत. त्यामुळे आगामी या दोन्हीही जागा शिंदे गटाकडेच असतील. दोन्ही विद्यमान खासदारांनाच उमेदवारी मिळेल, असा दावा माजी मंत्री व शिवसेना संपर्कप्रमुख विजय शिवतारे(Vijay Shivatare) यांनी केलेला आहे.

याचबरोबर ''शिवसेनेत पुर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची एक अशी यंत्रणा होती. त्यातून सामान्य कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला न्याय मिळत होता. आता ही परिस्थिती बदलली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारापासून आम्ही दूर जाऊ लागलो. परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांना वेगळा विचार करावा लागला.'' असं शिवतारेंनी म्हटलं आहे.

याशिवाय ''सर्वसामान्य माणूस, पदाधिकारी व शिवसैनिक यांच्याशी नाळ जुळलेला नेता म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच आता ते मुख्यमंत्रीपदावर असल्यानंतर आपण पक्षाची ताकद वाढवण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले पाहीजेत.’ असेही शिवतारे म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT