Loksabha Election : ''प्रतापराव चिखलीकरच नांदेड लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार'' ; प्रदेशस्तरावरील 'या' महिला नेत्याचा दावा!

Prataprao Patil Chikhlikar : जागा राखण्यासाठी भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार तयारी; चंद्रशेर बावनकुळे पुढील आठवड्यात नांदेड दौऱ्यावर असणार
Mp Pratap Patil Chikhlikar
Mp Pratap Patil ChikhlikarSarkarnama
Published on
Updated on

Nanded News : नांदेड लोकसभा मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव करून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर निवडून आले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पराभवाची चर्चा राज्यभर झाली होती. या पराभवानंतर कांग्रेसने गेल्या पाच वर्षांत बरेच पॅचवर्क केले आहे.तर भारतीय जनता पक्ष ही जागा कायम ठेवण्यासाठी झपाटून कामाला लागला आहे.

नांदेड लोकसभेची लढत भाजप व‌ काँग्रेससाठी प्रतिष्ठेची‌ असणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातून उमेदवार कोण असणार? हा एक उत्सुकतेचा विषय झाला आहे. विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण(Ashok Chavan) अशीच पुन्हा लढत होते की उमेदवार बदललेले जातील या बाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mp Pratap Patil Chikhlikar
Ashok Chavan : ''नुकसान झाल्यानंतर 15 दिवसांनी केंद्रीय पथक येणार असेल, तर...'' ; अशोक चव्हाणांचं विधान!

नांदेड लोकसभा मतदारसंघातून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर(Prataprao Patil Chikhlikar) हेच उमेदवार असतील असा दावा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे चिखलीकर यांनी केला आहे. त्या अर्धापूर (जिल्हा नांदेड) येथे महिला आघाडीच्या बैठकीला उपस्थित होत्या, त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.

लोकसभा निवडणूक जवळ आल्याने भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे. महिला मेळावे, संघटनात्मक पातळीवर बांधणी, सेल्फी विथ लाभार्थी असे अभियान सुरू केले आहे. तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते राज्यातील महायुतीच्या व केंद्रातील मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न करीत असुन, विविध ‌‌‌‌‌‌‌‌‌कार्यक्रमांचे आयोजन करुन माहिती देत आहेत.

Mp Pratap Patil Chikhlikar
Osmanabad Lok Sabha Constituency : ग्रामीण भागातील तरुणाईसाठी 'व्हिजन' घेऊन काम करणारे बसवराज मंगरुळे

नांदेड लोकसभेची जागा भाजपासाठी डेंजर झोनमध्ये असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच संभाव्य उमेदवारांची चर्चा देखील सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रणीता देवरे चिखलीकर यांच्या दाव्याला एक वेगळे महत्त्व आहे.

अर्धापूर शहरातील माँ साहेब जिजाऊ मंगल कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मार्गदर्शन केल्यानंतर पत्रकारांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण असेल? याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा चांगला संपर्क आहे. पक्ष सर्वेक्षण करतो. पक्षश्रेष्ठींनी प्रतापराव पाटील चिखलीकर हेच उमेदवार असतील असे सांगितले आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) हेच उमेदवार व कमळ या चिन्हावर मतदार मतदान करतील असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना प्रणिता देवरे चिखलीकर यांनी सांगितले आहे.

Mp Pratap Patil Chikhlikar
Lower Panganga Project : 'निम्न पैनगंगा' मुद्दा अधिवेशनात गाजणार; अंबादास दानवे, प्रतिभा धानोरकर लक्षवेधीद्वारे मांडणार!

महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणीता देवरे चिखलीकर या खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या कन्या आहेत.तसेच त्यांचा चांगला संपर्क आहे.गेल्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पक्ष संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.तसेच पुढील आठवड्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.

या दौऱ्यात संभाव्य उमेदवार कोण असेल यावर चर्चा होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना उमेदवारी मिळणार असे स्पष्ट प्रणीता देवरे यांनी सांगितले आहे.त्यांच्या दाव्यामुळे उत्सुक उमेदवारांत चलबिचल सुरू होणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com