Chandrashekhar Bawankule News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : शेवटी पोटातलं ओठावर आलंच; बावनकुळेंनी बोलून दाखवली 'ती' खंत

Roshan More

Pandarpur : निवडणुका जवळ येत आहेत तसतसे पक्षाचे तिकीट आपल्यालाच मिळणार, असा दावा राजकीय नेत्यांकडून करण्यात येतोय. मात्र, आपला अनुभव सांगत इच्छुकांना सबुरीचा सल्लाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. तिकीट वाटप हे केंद्रीय समिती करते त्यामुळे भाजपमध्ये केव्हाही कोणाला तिकीट देऊ शकतो आणि थांबवू शकतो, असे बावनकुळे म्हणाले.

पक्षाने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांना आमदारकीचे तिकीट दिले नव्हते. बावनुकळे यांनी देखील पक्षाचा आदेश मानत पक्ष संघटनेसाठी काम केले. मात्र, मी 15 वर्षे आमदार , ऊर्जामंत्री म्हणून चांगले काम केले. पक्षाने मला लढू नका म्हणून सांगितले, असे म्हणत बावनकुळे यांनी आमदार-खासदारांना इशाराच दिला आहे. तसेच मोहिते पाटील आणि खासदार निंबाळकर या दोघात मतभेद आहेत पण मनभेद नसल्याचा निर्वाळा देत माढा लोकसभेची जागा मोठ्या मताधिक्याने भाजप जिंकेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरेंना रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेसाठी निमंत्रण नसल्यावरून सुरु असलेल्या चर्चांवर बावनकुळे यांनी आपले मत व्यक्त केले. देशभरातील लाखो लोकांनी कारसेवेसाठी हयात घालवली. त्यांना न्यासाने आमंत्रण दिले आहे. कोणाला बोलवायचे हा न्यासाचा अधिकार आहे. दर्शन घ्यायला निमंत्रण कशाला पाहिजे, असा टोला देखील त्यांनी ठाकरेंना लगावला. तसेच उद्धव ठाकरेंनी काढलेल्या आक्रोश मोर्चाची खिल्ली उडवत सत्तेत असताना अडीच वर्ष काय केले, असा सवाल केला.

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून सुरू असलेल्या निमंत्रण वादावरुन काँग्रेस आणि संजय राऊत यांच्यावर नाव ने घेता बावनकुळे यांनी सडकून टीका केली. राम मंदिर उभारल्याने अनेकांच्या पोटात दुखत आहे. 65 वर्ष राज्य करणाऱ्यांनी त्यांच्या काळात हे का केले नाही, असे सवाल देखील बावनकुळे यांनी उपस्थित केला . तसेच 22 जानेवारीला 527 वर्ष तंबूत असलेले रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात जात आहे, असे ही बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT