Maratha Reservation News : 'भुमरे मामा' शिंदे समितीला पुन्हा मराठवाड्यात पाठवा ; मनोज जरांगे यांची मागणी

Sandeepan Bhumre News : संदीपान भुमरे हे आमचे मामा आहेत, त्यामुळे आम्ही मामांकडे अनेक मागण्या केल्या आहेत.
Maratha Reservation News
Maratha Reservation NewsSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil News : मराठा आरक्षणासाठी 20 जानेवारीला मुंबईत धडक देण्याची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आज भेट घेतली. (Maratha Reservation News) या भेटीत जरांगे-पाटील यांनी भुमरे यांच्याकडे मराठवाड्यात शिंदे समिती पुन्हा पाठवा, मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या आहेत, या शिवाय या समितीच्या कामाचा वेग वाढवण्याची मागणी केली.

Maratha Reservation News
Maratha Reservation News : रोष कमी होईना, भाजप आमदाराला गावाबाहेर काढले!

या शिवाय सारथीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना मदत, नोकरी, मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्या. (Maratha Reservation) तसेच 2017 मध्ये आरटीओ परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या नियुक्त्या तातडीने करा, त्या मुलांचे नुकसान करू नका, अशा अनेक मागण्याही त्यांनी भुमरे यांच्याकडे केली.

संदीपान भुमरे हे आमचे मामा आहेत. त्यामुळे आम्ही मामांकडे अनेक मागण्या केल्या आहेत. (Marathwada) त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून तातडीने मार्ग काढणार असल्याचे आश्वासन दिल्याचे भुमरेंनी दिल्याचे जरांगे-पाटील यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर 20 जानेवारी रोजी मुंबईत बेमुदत उपोषण करण्यावर आपण ठाम आहोत. कुठल्याही परिस्थितीत मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता आम्ही माघार घेणार नाही, असेही जरांगे-पाटील यांनी यावेळी भुमरेंना ठणकावून सांगितले. तर जरांगे-पाटलांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपण त्यांची भेट घेतली, असे भुमरेंनी सांगितले

यावेळी जरांगे-पाटील यांनी जे मुद्दे मांडले, मागण्या केल्या त्या सगळ्यांवर तातडीने मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. शिंदे समिती दोन दिवसांत मराठवाड्यात येऊन नोंदी तपासण्याचे काम करेल. या शिवाय राज्यातील नोंदी तपासणीच्या कामालाही समिती वेग देईल.

Maratha Reservation News
Maratha Reservation: 'गोळ्या घातल्या तरी...; जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा

या शिवाय सारथी, आरटीओच्या परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्ती, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना मदत, नोकरी संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, असा शब्द मी जरांगे-पाटील यांना दिला असल्याचे भुमरे यांनी माध्यमांना सांगितले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे-पाटील मुंबईत बेमुदत उपोषण करणार आहेत, यावर मात्र भुमरे यांनी बोलणे टाळले, तसेच या संदर्भात तुम्ही त्यांनाच विचारा, असे म्हणत बोलणे टाळले.

Edited By : Jagdish Pansare

Maratha Reservation News
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यावर राजकारणात येणार ? जरांगेंनी दिलं 'हे' उत्तर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com