Sachin Chavan_Chandrasen Chavan 
पश्चिम महाराष्ट्र

Chandrasen Chavan: मुलाने पकडली पोलिसाची कॉलर! बाप म्हणतो, "कोर्ट माझं वाकडं करू शकत नाही"; कोल्हापुरात काँग्रेस नेत्याला दणका

Chandrasen Chavan: काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण आणि त्यांचा मुलगा चंद्रसेन चव्हाण याने पोलिसांची कॉलर धरत शिवीगाळ करत धमकावण्याचा प्रकार कोल्हापुरात घडला आहे.

Rahul Gadkar

Chandrasen Chavan Kolhapur Crime News : काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण आणि त्यांचा मुलगा चंद्रसेन चव्हाण याने पोलिसांची कॉलर धरत शिवीगाळ करत धमकावण्याचा प्रकार कोल्हापुरात घडला आहे. इतकेच नव्हे तर पोलिसांच्या वाहनांच्या गाडी आडवी मारून, काँग्रेसचा माजी नगरसेवक असलेल्या सचिन चव्हाण यांनी "कोर्ट माझं काही वाकडं करू शकत नाही" असं म्हणत थेट पोलिसांना आव्हान दिलं आहे. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सचिन चव्हाण आणि चंद्रसेन चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन दादू कुंभार यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार सचिन दादू कुंभार हे जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. मंगळवारी मध्यरात्री गस्त घालण्यासाठी ते पोलीस वाहनातून पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्यासमवेत बाहेर पडले. गस्तीवर असताना मंगळवारी 19 मेच्या रात्री 12 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास काही तरुण रंकाळा तलावासमोरील चेंज-मी फिटनेस सेंटर समोर असणाऱ्या कमानीत मोठमोठ्याने आरडाओरडा, दंगामस्ती करत असल्याचं दिसून आलं.

यावेळी पोलीस निरीक्षक लोंढे व सचिन कुंभार यांनी तरुणांना समजावून सांगत असताना चंद्रसेन सचिन चव्हाण याने पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. "तुम्हाला काय करायचंय, जातो की" असं उद्धट मोठ्या आवाजात रागाने बोलत कुंभार यांच्या अंगावर धावून गेला. तसेच त्यांची कॉलर धरुन "****त तुला माहिती नाही का मी कोण आहे? थांबा तुम्हाला माझा बाप कोण आहे ते दाखवतो" अशी शिवीगाळ करत "मी चंद्सेन चव्हाण आणि माझा बाप सचिन चव्हाण आहे, तुम्हाला आता दाखवितो" अशा शब्दांत धमकी दिली.

दरम्यान, पोलीस निरीक्षक लोंढे हे चंद्रसेन चव्हाणला पोलीस व्हॅनमधून घेऊन जात असताना सचिन चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. टिंबर मार्केट कमानीच्या समोर पोलिसांच्या वाहनाला आपली गाडी आडवी घालून "तुम्ही माझ्या मुलाला कसं घेऊन जाता पाहतोच, माझा मुलगा काय रस्त्यावर पडलाय का?" अशा शब्दांत पोलिसांशी वाद घातला. इतकंच नव्हे तर "तुम्हाला काय कारवाई करायची ती करा, कोर्ट आमचं काय वाकडं करणार? उद्या त्याला सोडवून आणतो" तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी दिली.

यानंतर पोलिसांनी या दोघा बापलेकाला चांगलाच दणका दिला. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात या दोघांवर पोलिसांना शिवीगाळ, वर्दीवर हात टाकणे, धमकी देणे तसंच शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT