Chandrashekhar Bawankule and Sushilkumar Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : सुशीलकुमार शिंदेंना भाजपकडून ऑफरच्या चर्चांवर बावनकुळेंचं मोठं विधान, म्हणाले...

Sampat Devgire

Maharashtra Politics : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना आता हळूहळू वेग येत आहे. एककीडे महायुती आणि महाविकास आघाडीतीलही प्रमुख पक्ष जागा वाटपाबाबत वरिष्ठ पातळवीर चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे अन्य पक्षातील आमदार, खासदारांसह मातब्बर नेत्यांना आपल्या गटात सामील करून घेण्याची चढाओढ पाहायला मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांना भाजपकडून ऑफर आल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. ज्यावर आता खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच सुशीलकुमार शिंदे(Sushilkumar Shinde) यांनी मला एका नेत्याकडून भाजपप्रवेशाची ऑफर आली असल्याचा गौप्यस्फोट केला, तर सुशीलकुमार शिंदे हे सुसंस्कृत नेते आहेत, असे सांगत भाजपकडून त्यांच्या प्रवेशासाठी पायघड्या अंथरल्या जात असल्याची चर्चा जोर धर आहे.

या पार्श्वभूमीवर सोलापूर दौऱ्यात माध्यमांना प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) म्हणाले, 'आम्ही कुणालाही आमदारकी, खासदारकीसाठी पक्षात या असे म्हणणार नाही. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारायला कुणी तयार असेल आणि पक्षात प्रवेश करत असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करणार. '

तसेच 'भाजपने सुशीलकुमार शिंदे किंवा प्रणिती शिंदे यांना ऑफर दिली नाही. आमच्या पक्षाला तशी गरज नाही, पण कुणी जर आमचा दुपट्टा घालायला तयार असेल तर आम्ही तयार आहोत.' असंही यावेळी बावनकुळेंनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंवर निशाणा -

याशिवाय उद्धव ठाकरेंवर(Uddhav Thackeray) टीका करताना बावनकुळे म्हणाले की, नरेंद्र मोदी हेच अखंड भारत निर्माण करू शकतात, असे उद्धव ठाकरे व संजय राऊत म्हणाले होते. परंतु ज्या काँग्रेस पार्टीने रामाला, रामसेतूला काल्पनिक म्हटले आहे अशा लोकांसोबत उद्धव ठाकरे आहेत. तसेच ठाकरे यांच्या सर्व आक्षेपांना राहुल नार्वेकर यांनी उत्तर दिले आहे, असंही त्यांनी सांगितलं.

तसेच 'उमेदवार ठरविण्याचा अधिकार भाजपाच्या संसदीय समितीला असून, महायुतीमधील तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून कोणाला कोणती जागा द्यायची हे ठरवतील. त्यावर संसदीय मंडळ निर्णय घेईल.' असेही बावनकुळे म्हणाले.

जितेंद्र आव्हाड स्टंटबाज -

'जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) हे स्टंटबाज आहेत, त्यांना काही तरी बोलायचे असते. त्यांना न्यायव्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांचे न्यायव्यवस्थेबाबत बोलने योग्य नाही. त्यांना काहीतरी बोलून स्टंटबाजी करायची आहे. यापूर्वी ते प्रभू श्री रामचंद्रावरही बोलले होते. महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य बिघडेल अशी विधाने त्यांनी करू नयेत.' असा सल्लाही बानवकुळे यांनी दिला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT