Bjp News : बावनकुळेंची कमाल... दावा शिंदेंचा, खापर माध्यमांवर

Chandrashekhar Bawankule On SushilKumar Shinde : शिंदेंच्या दाव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

SushilKumar Shinde Statement Row :

सोलापुरातील प्रकल्प हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सर्वसामान्य जनतेला 15000 घरे देण्यासाठी पंतप्रधान मोदी सोलापुरात येत आहेत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली दिली. सर्वांसाठी हा आनंदाचा क्षण आहे, सोलापुरातील वॉरियर्स बैठक ही PM Modi यांच्या स्वागतासाठी करण्यात आली होती, असे ते म्हणाले.

Chandrashekhar Bawankule
Sushilkumar Shinde : बड्या नेत्याकडून मला अन् प्रणितीला भाजप प्रवेशाची ऑफर, पण...; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

भाजपने आपल्याला ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला. प्रणिती शिंदे किंवा सुशीलकुमार शिंदे यांना भाजपकडून अशी कोणतीही ऑफर दिली नाही, असे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले. मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत, असे म्हणत बावनकुळे यांनी माध्यमांवर खापर फोडले.

भेट होणे ही गोष्ट वेगळी आहे. सुशीलकुमार शिंदे आणि माझी ही दोन-तीन वेळा भेट झाली आहे. पण ती गोष्ट वेगळी आहे. कुणीही मोदींच्या नेतृत्वात भाजपचा दुपट्टा घालण्यास तयार असेल, जसे अजितदादा यांनी भाजपला समर्थन देताना सांगितले होते. जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदींमध्ये आहे, असे अजितदादा म्हणाले होते. यामुळे शरद पवार यांना सोडून अजितदादा भाजपबरोबर आले, असेही ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपचा दुपट्टा नेहमी तयार आहे. तो कुणीही असू द्या. मात्र त्यासाठी आम्ही कुठलीही ऑफर देणार नाही आणि कुठल्याही सीटसंदर्भात कमिटमेंट देणार नाही. भाजपचे खासदार, आमदार असे म्हणणार नाही. मोदींना साथ देण्यासाठी कोणी येत असेल तर आम्ही त्यांना नाही म्हणणार नाही, असे म्हणत बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

काही लोक स्टंटबाज आहेत. सकाळी 9 वाजता झोपून उठायचं. मीडियाशी काही तरी बोलावे लागणार म्हणून बोलतात, असा टोला बावनकुळे यांनी लगावला. तसेच संजय राऊत यांच्या वक्तव्याला उत्तर आमदार नीतेश राणे देतील, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

R...

Chandrashekhar Bawankule
Sharad Pawar : शरद पवारांच्या सभेत चर्चा ‘बनवाबनवी’मधील धनंजय मानेंची... नेमकं काय घडलं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com