Raju Shetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti : स्वाभिमानी चळवळीची शिस्त बिघडली; आनंदोत्सवातच राजू शेट्टी पडले, नेमकं काय झालं ?

Rahul Gadkar

Kolhapur Political News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दिवसभराच्या आंदोलनाला अखेर यश आले. यानंतर स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मात्र काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी धिंगाणा घालत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या धक्क्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी रस्त्यावर पडले. तर माध्यम प्रतिनिधींनाही धक्काबुक्कीचा प्रकार घडला. परिणामी दिवसभर कमावलं आणि आनंदोत्सवातच गमावलं, अशी गत संघटनेची झाल्याची चर्चा आहे.

आंदोलनाला यश मिळाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर फुलाची वर्षाव केला. फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. मात्र या आनंदाला गालबोट लावण्याचे काम काही हुल्लडबाज कार्यकर्त्यांनी केला आहे. आनंदोत्सव साजरा करताना अतिउत्साही कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातला. यामुळे कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेतलेले राजू शेट्टींही पडले. तसेच दहशत माजवून काहींनी माध्यम प्रतिनिधींनाही धक्काबुक्की केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हा प्रकार लक्षात येताच राजू शेट्टी कार्यकर्ते आणि प्रसार माध्यम प्रतिनिधींच्या मधोमध आले. त्यांनी उत्साही कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. तसेच झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते माध्यमांना कधीच धक्काबुक्की करणार नाहीत. जाणून-बुजून हिंसक रूप देण्यासाठी काही इतर लोक आंदोलकांमध्ये घुसले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कारखानदारांना दोन आठवड्यात गुडघ्यावर आणण्याचा इशारा शेट्टींनी दिला होता. आता आंदोलनानंतर स्वाभिमानी संघटनेच्या मागण्या कारखानदारांनी मान्य केल्या आहेत. त्यामुळे संघटनेनी बेंगलोर मार्गावर केलेले चक्काजाम आंदोलन मागे घेतले. कोल्हापुरात आंदोलनाला यश आल्यानंतर स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी आपला मोर्चा सांगलीकडे वळवणार असल्याची घोषणा केली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT