Devendra Fadnavis : फडणवीस दर्शनाला, पाटील-भरणे स्वागताला; श्री लक्ष्मी नृसिंहाचा आशीर्वाद कुणाला ?

Harshvardhan Patil Vs Dattatray Bharne : इंदापूरमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या घडामोडीच्या शक्यता
Devendra Fadnavis, Harshvardhan Patil, Dattatray Bharne
Devendra Fadnavis, Harshvardhan Patil, Dattatray BharneSarkarnama
Published on
Updated on

Indapur Political News : पंढरपूर येथील पांडुरंगाच्या महापूजेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक आपले कुलदैवत श्री लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन घेतले. यावेळी फडवीसांच्या स्वागतासाठी कट्टर विरोधक भाजप नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी हजेरी लावली. त्यामुळे इंदापूरमधून पाटील की भरणे यापैकी कुणाला श्री लक्ष्मी नृसिंहाचा आशीर्वाद मिळणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

कार्तिकी एकादशीच्या महापुजेनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस निरा नरसिंहपूरला कुलदैवताच्या दर्शनासाठी गेले. यावेळी इंदापूर तालुक्यातील कट्टर विरोधक पाटील आणि भरणे यांनी फडणवीसांचे स्वागत केले. 'भाजपमध्ये असल्याने रात्री शांत झोप लागते,' असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले होते. दरम्यान, विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन अजित पवार सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्री झाले. आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवारांच्या जवळचे मानले जातात. सध्या भाजपकडून लोकसभेसाठी पाटलांची चर्चा आहे.

Devendra Fadnavis, Harshvardhan Patil, Dattatray Bharne
Laxman Dhoble Bageshwar Baba : लक्ष्मण ढोबळे बागेश्वर बाबांच्या दरबारात; आशीर्वाद नेमका कशासाठी ?

दरम्यान, इंदापूर विधानसभेत दत्तात्रय भरणे यांनी पाटलांवर 2014 आणि 2019 अशी दोन वेळा मात केली. पाटलांना लोकसभेत उमदवारी मिळाली नाही तर विधानसभेत इंदापूरसाठी महायुतीत मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या फडणवीसांच्या स्वागताला उपस्थित असेलेल्या भरणे की पाटील यापैकी कुणाला श्री लक्ष्मी नृसिंहाचा आशीर्वाद मिळणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'महाराष्ट्राच्या भल्यासाठी नेहमीच श्री लक्ष्मी नृसिंहाचा आशीर्वाद घेण्यासाठी व दर्शनासाठी येत असतो. दर्शन घेतल्याने काम करण्यासाठीची प्रेरणा व उर्जा मिळते. मागील अनेक दिवसांपासून येता आले नाही. त्यामुळे आज कार्तिकी शुद्ध एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल महापुजा करण्याचा व कुलदैवत श्री लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन घेण्याचा योग आला,' असे फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis, Harshvardhan Patil, Dattatray Bharne
Nagpur : निवडणूक आयोगानं चौकशीला बोलावल्यास सामोरे जाऊ

इंदापूर तालुक्यातील तिर्थक्षेत्र नीरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान फडणवीस कुटुंबियांचे कुलदैवत आहे. वर्षातून एकदा तरी फडणवीस कुटुंबिय दर्शनासाठी येत असतात. आज कार्तिक शुद्ध एकादशीनिमित्त पंढरपूर येथील शासकीय महापूजा उरकून हेलीकॉप्टरने ते नरसिंहपूर आले होते.

यावेळी अमृता फडणवीस, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, राम सातपुते, जयकुमार गोरे, धैर्यशील मोहिते पाटील, सरपंच अर्चना नितीन सरवदे, उपसरपंच रेणूका काकडे, उदयसिंह पाटील, सहाय्यक संचालक विलास वाहने, प्रांताधिकारी वैभव नावाडकर, तहसीलदार श्रीकांत पाटील, मुख्य विश्वस्त ज्ञानेश्वर आरगडे, विश्वस्त प्रशांत सुरू आदी उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Devendra Fadnavis, Harshvardhan Patil, Dattatray Bharne
Delhi High Court : घटस्फोटानंतर पत्नीने क्षमता असेल तर कमवावे; हाय कोर्टाने स्पष्टच सांगितले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com