Chhagan Bhujbal News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News : जेलमध्ये असताना भुजबळ करत होते पवारांना ब्लॅकमेल; जामिनावर सुटलेल्या माजी आमदार रमेश कदमांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics : अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी कदम जेलमध्ये होते. ते जामिनावर बाहेर आहेत.

Mangesh Mahale

Pandharpur : जामिनावर सुटल्यानंतर माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

"छगन भुजबळ जेलमध्ये असताना लवकर जामीन मिळावा, यासाठी शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे," असा मोठा गौप्यस्फोट रमेश कदम यांनी केला आहे. पंढरपुरात ते पत्रकारांशी बोलत होते. अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी कदम जेलमध्ये होते. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत.

रमेश कदम म्हणाले,"जेलमध्ये असताना छगन भुजबळ हे नाराजी बोलून दाखवत होते. माझा जामीन लवकर झाला नाही तर मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल,असे सांगत होते. तुरुंगात असल्यावर छगन भुजबळ हे रोजच आजारी पडत होते. त्यांना रोजच उपचाराची गरज होती. पण आता छगन भुजबळ हे चांगलेच फिट आहेत,"

"जेलमध्ये गेल्यावरच ते आठ दिवसांतच आजारी पडले. छातीत दुखतंय ही कारण दाखवून जामिनासाठी नेत्यांची, पक्षांची सहानुभूती मिळवायचे. परंतु आता ते फिट दिसतात," असा टोला रमेश कदमांनी लगावला आहे.

"भुजबळ जेव्हा तुरुंगात होते. तेव्हा त्यांच्याशी माझी भेट होत असे. त्यावेळी भुजबळ हे पवार साहेबांनी मला मदत केली पाहिजे. जामिनाला खूपच उशीर होत आहे, असे म्हणत माझ्याजवळ नाराजीदेखील बोलून दाखवायचे," असे कदम म्हणाले.

कोण आहेत रमेश कदम

  1. रमेश कदम यांच्यावर अण्णा भाऊ साठे महामंडळामध्ये 312 कोटी रुपयांच्या घोटाळा केल्याचा आरोपआहे.

  2. त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. सध्या त्यांना सर्व गुन्ह्यांमध्ये जामीन मंजूर झाला आहे.

  3. नेहमीच सतत चर्चेत राहिलेल्या कदमांचा एका व्हिडिओ क्लिपमध्ये जेलमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करत असल्याचं ते दिसलं होतं.

  4. भायखळा जेलमध्ये असताना वॉर्डन मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणातही रमेश कदम यांनी पोलिसांवर आरोप केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT