Ganesh Visarjan 2023 : खड्ड्यांमध्ये गुलाल उधळत, पूजा करीत मनसेकडून बाप्पाला निरोप; महापालिका आयुक्तांना सद्बुद्धी दे...

MNS News : गणेश घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यात केक कापत "खड्डे का बर्थडे" आंदोलन केलं.
Ganesh Visarjan 2023
Ganesh Visarjan 2023 Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खड्ड्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. आज विसर्जन मिरवणुकीत जालना आणि कल्याणमध्ये मनसेने खड्ड्यांमध्ये गुलाल उधळत, पूजा करीत महापालिका प्रशासनाचा निषेध केला.

जालन्यात खड्डे बुजवले नसल्यामुळं मनसेनं थेट महापालिकेच्या प्रवेशद्वारातच आंदोलन केले. गणेशाच्या आगमनाआधी जालना शहरातील खड्डे बुजवण्यात यावेत, अशी विनंती मनसेने महापालिका आयुक्तांना केली होती. त्यानंतर काही ठिकाणी महापालिकेनं थातूरमातूर खड्डे बुजवले. मात्र, ते खड्डे पुन्हा उघडे पडल्याने मनसैनिक आक्रमक झाले होते.

Ganesh Visarjan 2023
Ajit Pawar News : अजितदादांना स्वीकारणं भाजप नेत्यांना जड जातंय? नेमकं काय कारण...

आयुक्तांना सद्बुद्धी दे...

संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी पालिकेसमोरील रेल्वे स्टेशन ते गांधी पुतळा रस्त्यावरील खड्ड्यांवर गुलाल उधळत जोरदार घोषणाबाजी केली. महापालिकेत आरती करीत एका भांड्यात गणेश मूर्तीचं विसर्जन केले. आयुक्तांविरोधात घोषणाबाजी करत प्रशासनाचा जाहीर निषेध केला. "आयुक्तांना सद्बुद्धी दे,' असे साकडे मनसेने बाप्पाला घातले.

खड्डे का बर्थडे...

महापालिका आयुक्तांनी गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील, असे आश्वासन दिले. मात्र, गणरायाचे आगमन खड्ड्यातून झाले तर हे विसर्जनाच्या दिवशीदेखील बाप्पांना या खड्ड्यातूनच परतीचा प्रवास करावा लागतोय, यासाठी मनसेने आक्रमक पवित्रा घेत दुर्गाडी किल्ल्याजवळील गणेश घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यात केक कापत "खड्डे का बर्थडे" आंदोलन केलं.

आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आयुक्त, शहर अभियंता, कार्यकारी अभियंत्यांच्या प्रतिमेला केक भरवत त्यांच्या प्रतिमेचे विसर्जन केलं. जोरदार घोषणाबाजी करत महापालिकेचा निषेध नोंदवला. मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

Ganesh Visarjan 2023
Shinde Government News : शिंदे सरकारवर न्यायालयाचे ताशेरे; ठाकरे सरकारच्या प्रकल्पांना स्थगिती देणे घटनाबाह्य

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com