Vijay Wadettiwar,Chhagan Bhujbal Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News : 'अंदर झालेला बंदर' आता पोपटपंची करतोय; वडेट्टीवारांनी उडविली खिल्ली

Vishal Patil

Satara News : 'अंदर झालेला बंदर' हा आता मांडीवर जाऊन बसलाय आणि तो सांगितल्यानंतर 'पोपटपंची' करायला लागेल, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केली होती. यावर आता छगन भुजबळ यांनी वडेट्टीवार यांच्या टीकेला सडेतोड उत्तर देत, माझं नाव घेऊन टीका करा असं म्हटलंय.

नायगाव (जि. सातारा) येथे छगन भुजबळ यांनी टीकेला उत्तर दिले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजप सोबत गेल्याने त्यांच्यावर कडक शब्दात टीका केली होती. यानंतर आता छगन भुजबळ यांनीही साताऱ्यात त्याला प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात राजकीय जुगलबंदी पहायला मिळणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेबद्दल भुजबळ यांना विचारले असता, ते म्हणाले, तुम्ही जे सांगत आहात ते मी ऐकले नाही. मात्र माझं नाव घेऊन बोलावं सातत्याने माझ्यावर टीका होत आहे. कदाचित त्यांना कोण भेटत नसल्याने मला टार्गेट केले जाते, याचा मला आनंद आहे. मी कोणत्याही टीकेचा पर्वा करीत नाही, मी मागासवर्गीयांचे काम गेल्या 35 वर्षापासून करतोय कुठलीही शक्ती मला रोखू शकत नाही.

अजितदादा आणि भुजबळांवर वडेट्टीवारांची जहरी टीका...

महाराष्ट्र सदन बांधला सुंदर आणि भुजबळ गेला अंदर. भ्रष्टाचाराच्या आरोपात अंदर झालेले आता 'बंदर बनून मांडीवर' बसले आहेत. मांडीवर बसलेले हे बंदर आता पोपट बनून बोलायला लागले आहेत. त्याला सफरचंद घे, संत्रा घे, खा बंदर. आता त्याचा पोपट करतील. एक झाला आहे विठू बारामतीचा, जो सत्तर हजार कोटी रुपये खाल्ल्यावर पोपट झाला. ज्याच्या मागे बाला तो तिथे गेला, असे म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांना खोचक टोला लगावला होता.

Edited by : Chaitanya Machale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT