Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil
Chhagan Bhujbal & Manoj Jarange PatilSarkarnama

Maratha Vs OBC : मराठा समाजाला दिलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करा, ओबीसी पेटले...

Maratha Reservation News : ओबीसी आरक्षण बचावासाठी मंत्री छगन भुजबळ त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूर, बीडला होणार ओबीसी एल्गार मेळावे घेतले.
Published on

Nashik : मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण हवे, म्हणून मनोज जरांगे-पाटील ठाम आहेत, तर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नका, म्हणून मंत्री छगन भुजबळ सभा घेत आहेत. राज्य सरकारने नेमलेल्या समितीद्वारे मराठा समाजातील ओबीसी नोंदी सापडणाऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे. मात्र, आता याविरोधात ओबीसी नेत्यांकडून रोखठोक भूमिका घेत मराठा समाजाला दिलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil
Chhagan Bhujbal News : छगन भुजबळांचे सावित्रीबाईंना अभिवादन, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शुद्धीकरण

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आता पंढरपूर आणि बीड येथे ओबीसी एल्गार मेळावे घेणार आहेत. यानिमित्ताने ओबीसी आरक्षण बचावाचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा त्यांचा निर्धार आहे. या मेळाव्यांच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शासकीय यंत्रणा काम करीत आहेत. त्याचा फेरविचार झाला पाहिजे. अनेक ठिकाणी मराठा समाजाला बनावट कुणबी प्रमाणपत्र मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अशा प्रकारे वितरित झालेले खोटे कुणबी दाखले रद्द करावेत, अशी मागणी ओबीसीनेते करणार असल्याची माहिती आहे.

मंत्री भुजबळ यांच्यासह ओबीसीनेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी आरक्षण बचावासाठी 6 जानेवारीला पंढरपूर आणि 13 जानेवारीला बीड येथे ओबीसी निर्धार मेळावे होतील. या मेळाव्यास भटके-विमुक्त ओबीसी, एसबीसी आणि अल्पसंख्याक समाजबांधव सहभागी होतील, असे समता परिषदेच्या वतीने सांगण्यात आले.

'या' असतील प्रमुख मागण्या

ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात येऊ नये, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जातनिहाय जनगणना जनगनना करण्यात यावी, मराठा समाजाला देण्यात आलेली खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावी, खोटी बिंदू नामावली तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, ७ सप्टेंबर २०२३ रोजी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने काढलेला जीआर ताबडतोब रद्द करावा, या प्रमुख मागण्या सभेतून करण्यात येणार आहेत.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com