Atake Villege maratha Andolan sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad Maratha Reservation : आटकेतील मराठ्यांचे भुजबळांना आव्हान; कराडमध्ये येऊनच दाखवा...

Umesh Bambare-Patil

-हेमंत पवार

Karad Maratha Reservation News : मंत्री छगन भुजबळ यांनी कऱ्हाडमध्ये येऊन दाखवावे. आम्ही त्यांना आमची ताकद दाखवून देऊ. पुन्हा मराठा समाजाचा अवमान करणारी वक्तव्ये केल्यास जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा आटके (ता. कऱ्हाड ) गावातील सकल मराठा समाजाने आज दिला.

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील Jarange Patil यांच्यासह मराठा समाज बांधवांविरोधात मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांच्यासह काही राजकीय नेते वादग्रस्त व अवमानकारक वक्तव्य करत आहेत. या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी व जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आटके गावातील मराठा समाज बांधव सोमवारी सायंकाळी एकत्र आले होते.

मराठा समाज शांत आहे. लोकशाही मार्गाने मराठा समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहेत. मात्र, मंत्री भुजबळ यांच्यासह काही राजकीय पक्षांचे नेते आपल्या स्वार्थासाठी ओबीसी समाज बांधव व मराठा समाज बांधव यांच्यात गैरसमज निर्माण करून दंगल घडविण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्यामुळे या नेत्यांनी मराठा समाजाबाबत आणि मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत अपप्रचार करणे न थांबवल्यास राज्यातील मराठा समाज बांधवांकडून जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही यावे मराठा समाज बांधवांनी दिला. Maharashtra Political News

महाराष्ट्र शिवाजी महाराजांचाच...

छगन भुजबळ हे महाराष्ट्र कोणाचा आहे, असे म्हणत आहेत. याकडे लक्ष वेधत महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे. हे लक्षात ठेवा ,असे सुनावत मराठा समाज बांधवांनी मंत्री भुजबळ यांच्यासह मराठा समाजाविरोधात बोलणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांचा निषेध नोंदवला.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT