Maharashtra Political News : महाराष्ट्रात 'चर्चे'चा भूकंप ! शिंदे, फडणवीस,पवारांनाही जाणवले धक्के

Chief Minister Change Discussion : " लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी अजितदादांना मुख्यमंत्री केले जाईल...''
Prithviraj Chavan, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Prithviraj Chavan, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

दीपक कुलकर्णी-

Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात सोमवारी ना कोणते सरकार कोसळले,ना पक्ष फुटला, ना आमदार पळाले! तरीही राजकीय पटलावर भूकंपाचे जबरदस्त हादरे बसले. त्याचे धक्के मुख्यमंत्री शिंदेंच्या आमदारांना बसले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू ठरला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांचा दावा...

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेने काय घडले आणि घडवले..?

दिवस शनिवारचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी कुटुंबासमवेत दिल्लीत.

राष्ट्रवादी विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरींचं ट्विट गाजले.

या ट्विटची चर्चा झडत राहिली अन् तिकडे शिंदे मोदींनी भेटले.

मोदींच्या भेट आटोपून अमित शहांकडे गेले.

मोदींनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांच्या धडाडीचे कौतुक केले.

मुख्यमंत्री बदलाची चर्चा कायम राहिली.

Prithviraj Chavan, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde News: पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री शिंदेंना भेटून निरोप दिला; 'या' खासदाराच्या दाव्याने खळबळ

दिवस रविवारचा

ठाकरे गटाची खोचक प्रतिक्रिया

शिंदेंची दिल्लीवारी आणि मोदी भेट हा निरोप समारंभच...!

संजय राऊतांचं नवं भाकीत

शिंदे यांची मुख्यमंत्रीपदावरून लवकरच हकालपट्टी होणार आणि अजित पवार हे मुख्यमंत्री होतील.  

दिवस सोमवारचा...

पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा...

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे एकनाथ शिंदे( Eknath Shinde)यांच्यासह सोळा आमदारांना अपात्र ठरवतील आणि पक्षांतराबाबत १० ऑगस्टपर्यत निकाल येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांचं निलंबन होईल. यानंतर अजित पवारांना शिंदेंच्या जागी मुख्यमंत्री केलं जाईल.

Prithviraj Chavan, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Amol Kolhe News : लोकशाही, सध्या तुझा आवाज खाली गेल्यासारखा जाणवतोय; खासदार कोल्हेंचे मार्मिक भाष्य

फडणवीसांचा विश्वास

कुठल्याही पक्षातील नेत्यांना आपले नेते मुख्यमंत्री झाले पाहिजे असं वाटणं स्वाभाविक आहे. पण या महायुतीमधील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून सांगतो की, या महायुतीचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच राहणार आहे. दुसरे कुणीही मुख्यमंत्री होणार नाही.

अजितदादांची सावधगिरी

महायुती सरकारमध्ये कोणतेही वाद नको, 'उगाचच नको ते वाद ओढवून घेऊ नका, अडचणी आणू नका असा सल्ला वजा कानउघाडणी उपमुख्यमंंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा घडवून आणणाऱ्या नेत्यांची केली.

प्रकाश आंबेडकरांचे तिघांकडे बोट

प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार मुख्यमंत्री होतील की नाही हे तीनच लोकं सांगू शकतात असं म्हटले. एक पंतप्रधान नरेंद्र मोदी, दुसरे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि खुद्द अजित पवार हे तीन लोकं या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील. चौथा माणूस यावर उत्तर देऊ शकणार नाही.

संजय शिरसाटांचा इशारा

अनिल पाटील किंवा त्यांच्या अन्य प्रवक्त्यांच्या वक्तव्याने अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत. पण, त्यांच्या अडचणीत नक्की वाढ होईल असा इशारा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट(Sanjay Shirsat) म्हणाले.

Prithviraj Chavan, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Prithviraj Chavan: अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर? पृथ्वीराज चव्हाणांनी फडणवीसांनाच बोलते केले

अनिल पाटलांचा विश्वास

गल्लीतील कार्यकर्त्यांपासून दिल्लीतील नेत्यांपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे, अशी इच्छा आहे. पण, त्यासाठी १४५ आमदारांचा आकडा गाठण्याची गरज आहे. तो गाठल्यावर अजित पवार राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री होतील.

गोरंट्याल यांचा टोला

काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले, अजित पवार मुख्यमंत्री होणार आणि एकनाथ शिंदे घरी जाणार !

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com