Amal Mahadik News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Amal Mahadik News : महाडिकांचा विरोधकांना सबुरीचा सल्ला; "कोल्हापुराचा कारखाना सांगलीचा करण्याचा डाव, मानेंचा आरोप

Mangesh Mahale

राहुल गडकर

Kolhapur : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत नुसता गोंधळ पाहायला मिळाला. दरवर्षीप्रमाणे होणारा गोंधळ यावर्षी झाल्याने सभासदांना नेमकं काय मिळालं? असा सवाल होत आहे. वार्षिक सभेत बोलताना माजी आमदार महाडिक व चेअरमन अमल महाडिक यांनी विरोधकांना सबुरीचा सल्ला दिला.

केवळ मोजकेच 25 लोक येऊन गोंधळ घालतात. केवळ विरोधाला विरोध म्हणून करू नका. काही लोकांकडून दिशाभूल सुरू आहे. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते विरोध करतात, पण तुम्ही काय करून दाखवता, कारखान्यात काय प्रगती करून दाखवता? याकडे सभासदांचे लक्ष असते. एक सभासद म्हणून मी नेहमीच कारखान्याचे हित पाहीन. आमची स्पर्धा विरोधकांशी नाही. तुम्ही सूचना द्याव्यात. आम्ही बदल करू, असे आश्वासित अमोल महाडिक यांनी केले.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे आभार

राजाराम कारखान्याच्या वार्षिक सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आभार मानले. गेल्या वर्षभरात जे शेतकरी व सहकारच्या दृष्टीने जे चांगले निर्णय घेतले. त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

हा निर्णय अत्यंत चुकीचा

'राजाराम'ची वार्षिक सभा संपन्न झाल्यानंतर विरोधकांनी समांतर सभा घेत सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेचा निषेध केला. पत्रकांची होळी करत निषेध नोंदवला. कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव माने यांनी समांतर सभेत सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले. "इथेनॉल यासह कारखान्याच्या हितासंदर्भात सर्व निर्णयाला आम्ही मंजुरी दिली आहे. मात्र, कार्यक्षेत्र वाढवण्याचा निर्णय हा अत्यंत चुकीचा आणि दुर्दैवी आहे," असे माने म्हणाले.

कोल्हापूर जिल्ह्याचा कारखाना सांगली जिल्ह्याच्या ताब्यात देण्याचा डाव महाडिक यांचा आहे, असा आरोप माने यांनी केला. महाडिकांना कोल्हापूर जिल्ह्यातील सभासद पाटील गटात येथील अशी भीती आहे. म्हणून बाहेर जिल्ह्यातील सभासद करून घेण्याचा डाव सत्ताधाऱ्यांचा आहे, असा आरोप माने यांनी केला.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT