Chhatrapati Sambhaji Nagar Mahapalika Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena News: शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आक्रमक; रस्त्यावर उतरून नाराजी व्यक्त करणाऱ्यांना किंमत देत नाही!

Shiv Sena Politics in Chhatrapati Sambhajinagar: गेली दहा-पंधरा वर्ष आपण शिवसेनेत निष्ठेने काम करत आहोत. परंतु आज ऐनवेळी राजेंद्र जंजाळ यांनी माझे नाव रद्द करून त्यांच्या समर्थकाला स्वीकृत सदस्य पदाची संधी दिली.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhaji Nagar municipal corporation news : महापालिकेच्या एकमेव स्वीकृत सदस्य पदी जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी आपल्या समर्थकांची वर्णी लावली. माझे नाव सुरुवातीला अंतिम झाले होते मात्र जंजाळ यांनी जातीयवाद करत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला डावल्याचा आरोप शिवसेनेचे विनोद बनकर यांनी केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी चक्क आपल्याच पक्षाच्या जिल्हाप्रमुखा विरोधात क्रांती चौकात जोडे मारो आंदोलन केले.

यावरून छत्रपती संभाजीनगर मधील शिवसेनेतील राजकारण चांगलेच तापले आहे. आपल्या विरोधात जोडे मारो आंदोलन करणाऱ्या विनोद बनकर यांना सुनावत जंजाळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विनोद बनकर कोणाचे समर्थक आहेत? हे मला माहीत नाही. परंतु एका जागेसाठी आमच्याकडे दहा जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी एका नावावर मुंबईतील नेत्यांकडून शिक्कामोर्तब करण्यात आले.

जिल्हाप्रमुख म्हणून त्याची अंमलबजावणी करण्याचे काम आणि कर्तव्य माझे आहे, ते मी पार पाडले. माझ्यावर जातीयवादाचा आरोप करणाऱ्यांना शिक्षण सभापती म्हणून एका दलित भगिनीला आम्ही संधी दिल्याचा विसर कसा पडला? मी जातीयवादी असतो तर तेही झाले नसते.

पक्षात जेव्हा एका जागेसाठी 10 जण इच्छुक असतात तेव्हा नऊ जण नाराज होणारच. ते स्वाभाविक आहे परंतु शिवसेनेमध्ये आदेश चालतो हा पक्ष शिस्तीचा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे नाराजी व्यक्त करणाऱ्यांनी नाराजी व्यक्त करायची होती तर ती पक्षाकडे म्हणजेच नेत्यांकडे किंवा माझ्याकडे व्यक्त करायला हवी होती. रस्त्यावर उतरून पक्षाची शिस्त मोडणाऱ्या नाराजांची नाराजी दूर करायला मला वेळ नाही.

अशा नाराजांना मी किंमत देत नाही, हा सगळा प्रकार मुंबईतील वरिष्ठ नेत्यांना कळविण्यात आला आहे. त्यावर काय निर्णय घ्यायचा किंवा कारवाई करायची? ते वरिष्ठ नेते ठरवतील, त्याची अंमलबजावणी जिल्हाप्रमुख म्हणून मी करेल, असा इशारा राजेंद्र जंजाळ यांनी दिला. दरम्यान स्वीकृत सदस्य पदासाठी इच्छुक असलेल्या विनोद बनकर यांनी सकाळपर्यंत माझे नाव या पदासाठी निश्चित होते, तशा प्रकारच्या बातम्याही समाज माध्यमातून समोर आल्या होत्या असा दावा केला.

गेली दहा-पंधरा वर्ष आपण शिवसेनेत निष्ठेने काम करत आहोत. परंतु आज ऐनवेळी राजेंद्र जंजाळ यांनी माझे नाव रद्द करून त्यांच्या समर्थकाला स्वीकृत सदस्य पदाची संधी दिली. जंजाळ हे जातीयवादी असून माझ्यासारख्या मागासवर्गीय कार्यकर्त्याला ते पुढे जाऊ देत नाही, असा गंभीर आरोप बनकर यांनी माध्यमांशी बोलताना केला.

स्वीकृत सदस्य पदावरून शिवसेनेत पुन्हा एकदा जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ विरुद्ध पालकमंत्री संजय शिरसाठ असा संघर्ष सुरू झाल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या राजकारणात सुरुवातीपासून जंजाळ यांनी पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यावर कुरघोडी केल्याचे दिसून आले आहे. उपमहापौर पदासाठी जंजाळ यांनी आपली उमेदवारी थेट एकनाथ शिंदे यांच्याकडूनच मिळवल्याने शिरसाठ यांचा तीळपापड झाला होता. यातूनच त्यांनी उपमहापौर पदासाठी जंजाळ यांची उमेदवारी निश्चित झाली असताना आपली कन्या नगरसेवक हर्षदा शिरसाठ यांना उपमहापौर पदासाठी अर्ज खरेदी करायला लावला होता.

मात्र या प्रकाराने संतप्त झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतून थेट पत्र काढून पक्षाचा आदेश पाळा, अशी सक्त सूचना दिली होती. जिल्ह्याच्या राजकारणात संजय शिरसाठ हे पालकमंत्री असूनही जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हे त्यांना वरचढ ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT