eknath shinde  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ekanath Shinde : मलंगगडाच्या मुक्तीचा मुख्यमंत्र्यांचा नारा; प्रतापगड संवर्धनासाठी शंभर कोटी

उमेश भांबरे :सरकारनामा

Satara News : छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून रायरेश्वर ते प्रतापगड ही गडकोट मोहीम धारकऱ्यांनी फत्ते केली आहे. मीही अनेक गड-किल्ले चढलो आहे. मलंगगडावरही मी जातो. आता प्रतागपडानंतर मलंगगडाच्या मुक्तीचा कार्यक्रम हाती घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित धारकऱ्यांना दिली.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या रायरेश्वर ते प्रतापगड या गडकोट मोहिमेची सांगता आज प्रतागपडाच्या पायथ्याशी असलेल्या पारगावात झाली. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टरने आले होते.

यावेळी संभाजी भिडे गुरुजी, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikanat Shinde), आमदार मकरंद पाटील, महेश लांडगे, नीतेश राणे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, तसेच प्रशासकीय अधिकारी आणि असंख्य धारकरी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, या सांगता सोहळ्यासाठी नजर जाईल तिथे हजारो तरुण एकत्र आले आहेत. इथे जणू भगवं वादळच आल्याचा भास होत आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींनी घडवलेला तरुण इथे नजर जाईल तिथे पाहायला मिळतोय. त्यांचे व्यक्तिमत्त्व तरुणांना लाजवेल, असे असून त्यांच्या प्रेरणेतून आजही लाखो तरुण घडत आहेत. या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या मातीत झाला त्या मातीत आपण हा कार्यक्रम करतोय याला वेगळे महत्त्व आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

किल्ल्यावरील अतिक्रमण गनिमी काव्याने दूर करणार

तरुणांना गडकोट किल्ल्यांचे महत्त्व कळावे, यासाठी या मोहिमेचे आयोजन केले जाते. रायरेश्वर ते प्रतापगड मोहीम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना केलेला मानाचा मुजरा आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाच्या कबरीचे होत असलेले उदात्तीकरण आम्ही थांबवले. आता लवकरच मलंगगडदेखील मुक्त केला जाईल. बाकी गडकोट किल्ल्यावरील अतिक्रमणदेखील महाराजांनी शिकवलेल्या गनिमी काव्याने दूर केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रतापगड जतन संवर्धनासाठी 100 कोटींचा निधी तीन टप्प्यात देण्यात येणार आहे. गडकोट किल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

(Edited by Sachin Waghmare)

R...

SCROLL FOR NEXT