Ajit Pawar Group : अजितदादांच्या गटात बेबनाव; ठाकरेंच्या खासदाराचा मोठा दावा

Vinayak Raut Criticize Eknath Shinde and Ajit Pawar Gat : अजित पवार गटात काय सुरू आहे?
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri Politics News :

सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालेलं नाही. अध्यादेशामध्ये तसा उल्लेखदेखील नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना फसवले आहे, अशी भावना मराठा समाजामध्ये निर्माण झाली आहे, असा गंभीर आरोप रत्नागिरी-सिंधुदुर्गचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

तसेच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजालासुद्धा फसवले आहे. त्यामुळे सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळेपर्यंत जरांगे-पाटील यांनी शांत बसू नये, असाही सल्ला विनायक राऊत यांनी दिला आहे. या आरक्षणाने समस्त मराठा समाजाला काही मिळालं, असं मला वाटत नसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत मराठा समाजाला परिपूर्ण आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हा लढा थांबवणे योग्य ठरेल असं मला वाटत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

Ajit Pawar News
Konkan Politics : ‘आता मजा बघा... Landing Shortly’ : उद्योगमंत्र्यांच्या भावाचा इशारा कोणाला?

आमची मागणी मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, ही आमची भूमिका आहे. संसदेमध्येच यासाठी आरक्षणाचा कायदा पास करणे आवश्यक आहे. आरक्षणाची थातूरमातूर उपाययोजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करीत आहेत ती पूर्णपणे टिकणारी नाही. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण संसद देऊ शकते, याप्रकरणी काल दिलेला अध्यादेश परिपूर्ण नाही, असे सांगत निवडणुकीनंतर सरकार हा जीआर रद्द करण्याची शक्यता असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नितीशकुमार यांनी देशवासीयांचा विश्वासघात केला आहे. त्यांचं भाजपसोबत जाणं म्हणजे लोकशाहीला घातक असल्याची टीका राऊत यांनी केली आहे. सत्तेसाठी गेलेले गद्दार एकमेकांच्या उरावर बसणार आहेत. अजित पवार गटामध्ये हा बेबनाव सुरू झालेला आहे. उद्या शिंदे गटात हा सुरू होईल. लोकसभा निवडणूक जवळ येईल, तशी शिंदे गटाच्या लोकांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातील. हे औटघटकेचे सरकार आहे, असा दावा राऊत यांनी केला.

भाजपचे युवा नेते आमदार नीतेश राणे यांच्यावरही त्यांनी टीका केली. ते स्वतःला खूप मोठे विश्वगुरू समजत असून पोपटपंची करणारा हा टिल्ला भाजपने पाळलेला प्राणी आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. त्यांच्या अंगात नेतेपद भिनलेले आहे. लवकरच कपाळमोक्ष होईल, असे सांगत विनायक राऊत यांनी नीतेश राणे यांच्यावर निशाणा साधला.

edited by sachin fulpagare

R...

Ajit Pawar News
Ravindra Chavan : भराडी आईला रवींद्र चव्हाणांचे साकडे; म्हणाले, 'आता पुन्हा मोदी...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com